अनुष्का शर्माच्या 'परी' चा टीझर बघितला का राव ?

Subscribe to Bobhata

NH १० सिनेमापासून अनुष्काच्या स्वतःच्या ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात झाली. NH १० नंतर आला फिलौरी. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले असं म्हणायला हरकत नाही. या दोन सिनेमांनी अनुष्काच्या नव्या प्रोडक्शनकडून चांगल्या चित्रपटांची आशा निर्माण केली आणि आता या प्रोडक्शनचा नवीन सिनेमा येतोय. त्याचं नाव आहे ‘परी’.

सिनेमात मुख्य भूमिकेत म्हणजे परीच्या भूमिकेत आहे अनुष्का शर्मा. या सिनेमाचा पहिला टीझर नुकताच आला आणि त्याने सर्वांची बत्ती गुल केली आहे. टीझरच्या सुरुवातीला अनुष्काचा शांत चेहरा दिसतो आणि हळू हळू त्या चेहऱ्यावर जखमा, व्रण आणि खुणा दिसू लागतात. शेवटी जखमांनी माखलेला चेहरा आणि आणि रक्ताने भरलेल्या डोळ्यानी टीझर संपतो. टीझरची १८ सेकंद भलतीच पकड बनवतात.

एकंदरीत हा एक थ्रिलर सिनेमा असेल असं दिसतंय. होळीच्या मुहूर्तावर २ मार्च रोजी 'परी' थेटरात येईल पण त्या आधी टीझर बघून घ्या राव. 

सबस्क्राईब करा

* indicates required