computer

एकात्मिक विकासाचा पॅटर्न म्हणजे लातूर पॅटर्न हे सांगणारा मराठवाड्याचा मुगुटमणी -लातूर जिल्हा

लातूर पॅटर्न या एका मोठ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे लातूर. क्षेत्रफळाच्या मानाने बराच मोठा असलेला हा जिल्हा आपल्या अनेक विशेषता टिकवून ठेवणारा आहे. १९९३ साली झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या नुकसान आणि त्या भयावह आठवणींवर मात करत लातूर आज पुन्हा नव्याने उभे राहत आहे. जिल्ह्याच्या याच काही विशेष गोष्टींची माहिती आज तुम्ही वाचणार आहात.

लातूर शहराचा इतिहास बघायचा म्हटला तर हे शहर कधीकाळी राष्ट्रकूटांची राजधानी होते असे बोलले जाते. नंतर इथे अनेक राज्यकर्ते येऊन गेले. राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग लट्टालुर यांच्या नावावरूनच लातूर हे नाव पडले असावे असाही एक कयास आहे. सर्वात शेवटी हैदराबाद संस्थानात असताना मराठवाडा मुक्ती संग्राम होऊन हा जिल्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा भाग झाला. १९८२ साली लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचे विभाजन झाले आणि लातूर हा स्वतंत्र जिल्हा म्हणून उदयास आला.

बालाघाट ही पर्वतरांग लातूर जिल्ह्यातही पाहायला मिळते. जिल्ह्यात काळी मृदा आहेच पण तांबडी आणि जांभळी मृदा सुद्धा आपले अस्तित्व दाखवते. मांजरा ही नदी लातूर जिल्ह्यातील महत्वाची नदी मानली जाते. अहमदपूर- उदगीर या भागात मन्याड लेंडी या नद्यांचा मैदानी प्रदेश आहे. जिल्ह्यात तावरजा आणि आणि तेरणा या मांजरा नदीच्या उपनद्यांची खोरी आहेत.

ज्वारी हेच या जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात ज्वारी, कापूस, मुग, तूर, भात, भुईमूग इ. पिके घेतली जातात तर तर रब्बी हंगामात गहू, हरभरा करडई, जवस ही पिके घेतली जातात. लातूरला चांगल्या प्रतीची डाळ होते. इथे उडीद, मुंग, हरभरा, तूरडाळ यांचे प्रमुख व्यापारी केंद्र आहे.

जिल्ह्यात कुलूप बनविण्याचे काम मुबलक प्रमाणात केले जाते. पितळ धातूपासून भांडी बनविण्याचा व्यवसाय ही अजून एक वेगळी गोष्ट इथे पाहावयास मिळते. लातूर येथील कोचिंग आणि प्रशिक्षण यामुळे मोठी ओळख मिळवून आहे.

जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात, यात क्रमांक ६१ आणि क्रमांक ३६३ यांचा समावेश आहे. बससेवा आणि रेल्वेसेवा यांच्या माध्यमातून इतर जिल्ह्यातील लोकांशी दळणवळण साधले जाते.

धार्मिकदृष्ट्या जगदंबा मातेचे मंदिर हे राष्ट्रकूटकालीन मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तुळजापूर येथील भवानीमातेच्या मंदिराचे प्रतिरुप या देवस्थानाला मानले जाते. लातूरपासून अवघे २ किमी अंतरावर असलेले सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिर हा मोठा सांस्कृतिक ठेवा या जिल्ह्याचा आहे. हे मंदिर ताम्रद्वज राजाने उभारले असे सांगितले जाते.

उदगीरचा किल्ला हा सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वात निजामाला पराभूत केले होते याची साक्ष देत उभा आहे. उदगीर किल्ल्यात अनेक महल आहेत. किल्ल्याजवळ एक खोल दरी आहे. येथे अरबी आणि फारशी भाषेत लिहिलेले काही दुर्लभ शिलालेख सुद्धा आहेत.

लातूर जिल्ह्याची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required