computer

रणवीरसिंगही यापुढे सुसह्य वाटेल असे मेट गालामधले चित्रविचित्र पोषाख केलेले सेलेब्रिटी पाह्यलेत का?

दोन दिवसांपूर्वी किम कार्डशियन काकूंचे काहीतरी नखशिखांत काळं घातलेले फोटो व्हायरल झाले आणि यावर्षी पुन्हा एकदा मेट गाला आणि तिथल्या फॅशन्स चर्चेत आल्या. हो, तोच तो मेट गाला, जिथे प्रियांका चोप्राचा मैलभर पसरलेला खाकी ड्रेस आणि त्यावरचे मीम्स व्हायरल झाले होते. तर या निमित्ताने हे मेट गाला प्रकरण काय आहे, तो लोकांना किंबहुना सेलेब्रिटींना इतका महत्त्वाचा का वाटतो आणि फॅशन जगतात याचं स्थान काय आहे हे सांगण्यासाठी हा आजचा लेख.

मेट गाला हा न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टस् कॉस्च्युम इन्स्टिट्यूट या संस्थेसाठी निधी गोळा करण्यासाठी आयोजित केला जाणारा वार्षिक समारंभ आहे. इन्स्टिट्यूटच्या वार्षिक फॅशन प्रदर्शनची सुरुवात इथून होत असते. दरवर्षी या समारंभाची वेगळी थीम असते. सेलेब्रिटी या थीमला साजेशी वेशभूषा करून या समारंभासाठी येत असतात.

१९४८ साली मेट गालाची स्थापना झाली असली तरी याला खरे वैभव प्राप्त झाले ते १९७३ सालापासून. तेव्हापासून मेट गाला न्यूयॉर्कच्या डोक्यावरील मानाचा तुरा समजला जातो. इथे कॉकटेल अवर आणि डिनर आयोजित केलेले असते. या कॉकटेल तासात सेलेब्रिटी रेड कार्पेटवर पदार्पण करतात. नंतर सर्वांसाठी जेवण आयोजित केले असते. सोबतच अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. तर असा सर्व मेट गालाचा समारंभ असतो.
 

मेट गाला फॅशन जगतातील अतिशय महत्वाचा असा समारंभ समजला जातो. जगभरातील सेलेब्रिटी विवीध कपडे परिधान करून या ठिकाणी येत असतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा समारंभ होऊ शकला नव्हता. अनेक महत्वाचे सेलेब्रिटी येथे दिसत असतात. इथे सेलेब्रिटी जे कपडे घालतात ती जगभर फॅशन बनते. पण यंदा सेलिब्रिटींनी घातलेले कपडे बघितले तर ही कसली फॅशन हाच प्रश्न तुम्हाला पडेल.
 

आपल्याकडे बिचारा रणवीर सिंग चित्रविचित्र कपडे घालतो म्हणून सारखा ट्रोल होत असतो. पण या मेट गालामधील सेलब्रिटींचे कपडे बघितले तर रणवीर सिंग खूप सोज्वळ वाटल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्हीच हा चित्रविचित्र पोशाख बघा आणि ठरवा.

सबस्क्राईब करा

* indicates required