computer

११ टॉयलेट एटीकेट्स खास पुरुषांसाठी !!

लहान मूल दोन वर्षाचं होईपर्यंत त्यांना पॉटी ट्रेनींग मिळालेलं असतं, पण पुरुषांना मात्र पॉटी ट्रेनींग दिली जात नाही. आता तुम्हाला प्रश्न पडेल, वयाने आणि डोक्याने (?) मोठ्या झालेल्या मुलाला पॉटी ट्रेनींग का द्यायची ? तर त्याची काही खास कारणं आहेत राव. ती समजण्यापूर्वी समाजातील पुरुषी मानसिकता समजून घेऊ या !

ती समजण्यापूर्वी समाजातील पुरुषी मानसिकता समजून घेऊ या!  सर्वसाधारण घरातील पुरुष मंडळी इतर सदस्यांना गृहीत धरून चाललेली असतात. काही अपवाद वगळता बहुतेक जणांना स्वच्छता आणि आरोग्य ही सामूहीक जबाबदारी आहे हे कळत नाही. म्हणूनच आपला आपला विषय आहे " खास पुरुषांसाठी टॉयलेट एटीकेट्स"

१. निसर्गाने दिलेल्या सोयीनुसार लघवी करताना पूर्ण कपडे(पँट) उतरवण्याची आवश्यकता पुरुषांना नसते. पण केवळ या कारणाने बरेचसे पुरुष लघवीला जाताना टॉयलेटचे दार फक्त ओढून घेतात. हे योग्य नाही.

२. लघवीला जाताना कमोडची रींग उचलून वर करण्याची तसदी बरेच जण घेत नाहीत. हे देखील अयोग्य आहे.

३. लघवी करण्याची योग्य पद्धत :

काहीजण लघवी करताना कमोडपासून दूर उभे राहून लघवी करतात. लघवीची धार सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच लांबीची नसते, हे सांगायला सायन्सची गरज नसतेच. पण त्यामुळे कमोडच्या रींगवर लघवी सांडते आणि काही थेंब फरशीवर पण सांडतात. आपल्याच घरातील इतर सदस्य महिलांना या रींगवरच बसायचे असते याची जाणिव पुरुषांना नसते.

४. कमोडमध्ये पडणार्‍या धारेचा आवाज फारसा मनोरंजक नसतो, तेव्हा सतत पाणी फ्लश करणे आवश्यक आहे.

५. टॉयलेटला जाताना एक्झॉस्ट फॅन चालू करण्याचे बरेच जण विसरतात. बर्‍याच वेळा लघवी करताना, गॅस पण बाहेर पडतात आणि तो घाणेरडा वास टॉयलेट्मध्ये कोंडून राहतो. तेव्हा पुरुषांनो एक्झॉस्ट फॅन न विसरता चालू करा.

६. टॉयलेटला जाताना हातात पेपर घेऊन जाऊ नका. नंतर तोच पेपर जंतूंसकट डायनींग टेबल किंवा टीपॉयवर पडलेला असतो. शक्य झाल्यास टॉयलेटमध्ये पेपर, पुस्तक, मोबाईल काहीही नेऊ नका.

७. सर्वात महत्वाचं, धार सोडून झाली की फ्लश करायला विसरू नका. आणि हो तुम्ही ज्या जागी आपला ऐवज रिकामा केला आहे त्या खजिन्याचं झाकण बंद करायला विसरू नका.

८. ऑफीसमध्ये बर्‍याच वेळा लघवी करताना शेजारच्या कलीग सोबत उभ्या-उभ्या कॉन्फरन्स करण्याची सवय बहुतेकांना असते. परिणामी धार भांड्याच्या बाहेर पडत राहते. थोडक्यात, हातातल्या कामावर पूर्ण लक्ष द्या.

९. बाहेर पडताना सुगंधी स्प्रे मारूनच बाहेर पडा. स्प्रे नसला तर माचीसची एक काडी जाळून बाहेर पडा. माचिसची काडी जाळल्यावर दुर्गंध नाहीसा होतो.

१०. घरातल्या बाथरुममधला ब्रश पुरुषांनी वापरला तर ब्रश नाराज होत नाही. अधूनमधून टॉयलेट स्वच्छ ठेवण्याची ज्बाबदारी उचलाच.

११. शेवटच्या काही सूचना महिला वर्गासाठी- घाईघाईने कमोडवरून उठून उभे राहू नका. आणि महत्त्वाचे म्हणजे कमोडमध्ये वापरलेले नॅपकीन टाकून फ्लश करू नका.

 

आणखी वाचा : 

अशी असते अंतराळात टॉयलेटची व्यवस्था !!

जगभरातले २० अतरंगी टॉयलेट्स - ७ नंबर वर जे आहे ते आपल्या सर्वांसाठी आहे राव !!

जपान मधील 'टॉयलेट गॉड' !!

सबस्क्राईब करा

* indicates required