उकळलेले पाणी पास तर वारंवार उकळेलेले नापास !

आपण सगळेच आरोग्याची काळजी घेतो. पिण्याचे पाणी गाळून घ्यावे, हे तर सगळेच सांगतात. त्यानंतर ते उकळून घ्यावे हे काही कोणाला शिकवायची गरज नाही. पण उकळलेले पाणी शिल्लक राहीले तर त्याचे काय करायचे हा महत्वाचा प्रश्न आहे. 

एक पर्याय म्हणजे पाणी फेकून देणे आणि दुसरा पर्याय म्हणजे तेच पाणी पुन्हा उकळून पिणे.  यापैकी दुसरा पर्याय आरोग्याला चांगलाच हानीकारक आहे. साहजिक मनात हाच प्रश्न उभा राहणार की दोन-चार वेळा उकळलेले पाणी जास्त शुध्दच असेल, मग ते हानीकारक असं का?

नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही सांगतोय. बघा , पाणी उकळलं की जंतू मरतील आणि पोटात जंतू संसर्ग होणार नाही.  पण पाण्यातल्या क्षाराचे काय?  ते क्षार पाण्यात तसेच राहतात. तेच ते पाणी पुन्हा उकळल्यावर पाण्याचे प्रमाण( volume) कमी होतं आणि त्या तुलनेने क्षारांचं प्रमाण वाढतं. आशा रितीने क्षाराचे प्रमाण जास्त असलेले पाणी प्यायल्याने काय नुकसान होते ते बघा!

पाण्यात विरघळलेले नायट्रेट क्षार : या पासून तसा धोका नसतो. पण वारंवार पाणी उकळल्यावर nitrosamine तयार होते आणि nitrosamine हे विषारी असते. ल्युकेमीया (रक्ताच्या cancer चा एक प्रकार ) लिंफोमासारखे आजार होऊ शकतात.

आर्सेनीक : पाण्यात अत्यंत अल्प प्रमाणात असते, पण आर्सेनीक विषारी असतेच. आर्सेनीकचे प्रमाण जास्त झाले तर वंध्यत्व, हृदयविकार आणि मेंदूचे संतुलन ढळणे असे काही आजार होऊ शकतात. 

फ़्लुराईड : फ्लोरीन म्हणजे कॅल्शियमचा चुलत भाऊ! पाण्यात कॅल्शियमचे क्षार विरघळलेले असतातच. कॅल्शियमचे प्रमाण वाढले तर किडनी स्टोन होऊ शकतात आणि फ़्लुराईड  वाढले तर दात आणि हाडे कमकुवत होतात, दात झिजतात आणि हाडे ठिसूळ होतात. 

आता थोडक्यात काही महत्वाचे!!
तेेच ते पाणी पुन्हा पुन्हा उकळून पिऊ नका. 
बाळाला सेरेलेक वगैरे देण्यासाठी तर नकोच नको! पाणी एकदाच उकळा आणि प्या. उरले तर फेकून दया !

सबस्क्राईब करा

* indicates required