प्रवासात उलटी का होते ? जाणून घ्या लोक्स !!

बस लागणे, गाडी लागणे म्हणजे काय राव ? आपण लांबचा प्रवास करताना आपल्याला अचानक घाम फुटू लागतो, मळमळ होते, मग काही वेळाने उलटी सुद्धा होते. यालाच गाडी लागणे किंवा वाहन लागणे म्हणतात. प्रवासादरम्यान अनेकांना याचा त्रास होतो. कार, बस, रेल्वे, अगदी जहाजा मधूनही प्रवास करताना हा त्रास होऊ शकतो आणि यात लहान मोठा असा फरक नसतो बरं का. पण काय राव, प्रवास दरम्यानच उलटी का होत असावी ? एऱ्हवी तर असं नाही होत !!

आज जाणून घेऊयात या मागचं वैज्ञानिक कारण.

स्रोत

वाहन लागणे म्हणजे 'मोशन सिकनेस'. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी मेंदू पर्यंत पोहोचवण्याचं काम कान, डोळे आणि स्नायुंच्या आधारे होतं. डोळे थेट समोर दिसणारं मेंदू पर्यंत पोहोचवतात तर कान त्याच्या मधल्या भागात असलेला तीन वक्राकृती हाडांचा संच आणि त्यातल्या द्रवाच्या हालचालींच्या मदतीने शरीराचं स्थान समजून त्याचे संकेत मेंदूकडे पाठवतो.

जेव्हा आपण एखाद्या वाहनात बसतो तेव्हा आपले कान, डोळे आणि स्नायू हे आवाज, वेग आणि दृश्य यात गोंधळतात आणि भिन्न भिन्न प्रकारचे संकेत मेंदू पर्यंत पोहोचवू लागतात. या तिन्ही प्रकारच्या संकेतात कुठेही ताळमेळ बसत नसल्याने मेंदूचा गोंधळ उडतो. यातून मेंदू स्वतःचा असा निष्कर्ष काढतो की हे सगळं विषबाधेमुळे होत असावं. आणि यावर मेंदूचा एकच उपाय ठरलेला असतो तो म्हणजे पोटातलं विष उलटी मार्फत बाहेर काढणे.

स्रोत

उदाहरणच द्यायचं झालं तर, कार मध्ये बसलो असताना आपल्याला डोळ्यांनी दिसतं की आपण वेगात पुढे जात आहोत. पण त्याच वेळी कानांना तो वेग जाणवत नाही, उलट शरीर स्थिर असल्याचं संकेत ते मेंदू पर्यंत पाठवतात आणि आपल्या शरीरातील स्नायू देखील यावेळी स्थिर असतात. इथूनच सगळी समस्या सुरु होते.

काहीवेळा बस किंवा रेल्वेने प्रवास करताना वाहनांचे धूर, माणसांच्या घामाचे वास यातूनही मळमळू शकतं, मात्र हे सगळं नसूनही जर उलटी होत असेल तर याला फक्त वरील कारण लागू पडतं.

सबस्क्राईब करा

* indicates required