जगातील सर्वात पहिला ‘सॅनिटरी नॅपकिन’ बनवला होता पुरुषांसाठी ??

स्त्रियांची मासिकपाळी- रक्तस्त्राव- त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे विषय केवळ स्त्रियांचेच आहेत असे समजणाऱ्या पुरुष वर्गाला हे वाचून धक्काच बसेल की जगातील सर्वात पहिला ‘सॅनिटरी नॅपकिन’ हा पुरुषांसाठी बनवला होता. बसला ना धक्का ?

कसा लागला शोध ?

स्रोत

‘सॅनिटरी नॅपकिन’ चा शोध लागला तो काळ होता पहिल्या महायुद्धाचा. जेव्हा फ्रान्स मध्ये युद्ध सुरु होतं आणि सैनिकांवर उपचार करणं अत्यंत गरजेचं होतं तेव्हा सैनिकांच्या जखमेतून होणारा रक्तस्त्राव रोखणे ही एक मोठी समस्या बनली होती. कापसाचा वापर किंवा बँडेजच्या वापरातून रक्तस्त्राव कमी करण्याचा प्रयत्न त्या काळातील परिचारिकांनी (nurses) केला पण काही उपयोग होत नव्हता. बँडेजमुळे रक्त वाहणे थांबत असलं तरी एका प्रमाणानंतर ते रक्त पुन्हा वाहु लागे.

कापूस आणि बँडेजला पर्याय म्हणून ‘स्फॅग्नम मॉस’ नावाच्या शेवाळाचा उपयोगही करण्यात आला होता. हे शेवाळ कपड्यांमध्ये गुंडाळून त्यांना जखमेवर लावण्यात येत असे. हे शेवाळ रक्त शोषून घेत असे. पुढे १९१७ साली अमेरिकेने युद्धात भाग घेतल्यानंतर त्यांनी याहीपुढे जात आणखी एक नामी उपाय शोधला.

 

स्रोत

आजच्या काळातील सॅनिटरी नॅपकिन सारखा दिसणाऱ्या पॅड चा जन्म इथेच झाला. या नॅपकिनला ‘सेल्युकॉटन’ असं नाव देण्यात आलं होतं. सेल्युकॉटनचं वैशिष्ट्य म्हणजे यात कापूस किंवा शेवाळ न वापरता एका विशिष्ट प्रकारच्या लाकडाचा लगदा वापरण्यात आला होता. आश्चर्य म्हणजे हा शोध याआधीच्या सगळ्या पर्यायांच्या कित्येक पटीने जास्त फायदेशीर ठरला. या सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या कंपनीचं नाव होतं किम्बर्ली क्लार्क कंपनी. ही कंपनी आजही सॅनिटरी नॅपकिन्स, टिश्यू पेपर इत्यादी बनवण्यात अग्रेसर आहे.

 

तर आता प्रश्न पडतो हा पुरुषांचा प्रॉडक्ट महिलांचा कसा झाला ?

त्याचं असं आहे. युद्धाच्या काळात सैनिकांच्या शुश्रुषा करणाऱ्या महिला परिचारिकांनी या सॅनिटरी नॅपकिनचा उपयोग त्यांच्या मासिक पाळी दरम्यान करण्यास सुरुवात केली. त्यांनी याचा असाही उपयोग होऊ शकतो हे शोधून काढलं. हे बँडेज कम पॅड सहजा सहजी डिस्पोजेबल असल्याने त्याचा वापर आणखी वाढला.

 

महिलांसाठी तयार करण्यात आलेली पहिली ‘सॅनिटरी नॅपकिन’

स्रोत

१९१८ साली युद्ध समाप्ती झाल्याबरोबरच या पॅड्सची मागणीही बंद झाली. युद्धानंतर  उरलेल्या पॅड्स चं काय करायचं याचा विचार करत असताना किम्बर्ली कंपनीच्या लक्षात आलं की युद्ध काळात स्त्रियांनी देखील याचा उपयोग केला होता.  

संशोधक आणि कंपनीने यावर विचार केल्यानंतर महिलांच्या उपयोगाची गोष्ट म्हणून हे सॅनिटरी नॅपकिन्स १९२० साली पहिल्यांदा बाजारात आणले गेले. हेच पॅड्स जगातील पहिले महिलांसाठीचे सॅनिटरी नॅपकिन्स म्हणून ओळखले जातात. किम्बर्ली कंपनीने त्यांना ‘कॉटेक्स सॅनिटरी पॅड्स’ नावाने बाजारात आणलं. जाहिरात करताना या प्रॉडक्टला 'सॅनिटरी टॉवेल्स फोर लेडीज' म्हणून ओळख मिळाली होतीसुरुवातीच्या काळात धीमेपणाने महिलांनी याला स्वीकारलं. एवढचं काय मासिक आणि वृत्तपत्रांनी याची जाहिरात करण्यास साफ नकार दिला. पण ही गोष्ट एवढी क्रांतिकारी ठरली की पुढे किम्बर्ली कंपनीशी स्पर्धा करण्यासाठी अनेक नव्या कंपन्या बाजारात आल्या.

तर अशी होती सॅनिटरी नॅपकिन्सच्या शोधाची कथा, जी सुरु होते पुरुषांपासून पण संपते महिलांवर.

सबस्क्राईब करा

* indicates required