computer

या सफाई कामगाराने दाखवलेला दानशूरपणा संपूर्ण देशाला प्रेरणा देतोय !!

व्यावसायिक, क्रिकेटपटू, सिनेकलाकार, खेळाडू तसेच सामान्य नागरिकांकडून कोरोनव्हायरसशी लढण्यासाठी देशाला मदतनिधी दिला जात आहे. सध्या एका सफाई कामगाराचं कौतुक होत आहे. या सफाई कामगाराने चक्क आपला दोन महिन्यांचा पगार मुख्यमंत्री मदतनिधीत दान केला आहे. 

त्याचं नाव आहे 'बोन्था साई कुमार'. तो आदिवासी समाजातून आला आहे. तेलंगणाच्या उटनूर भागात तो सफाई कामगार म्हणून काम करतो. तेलंगणाचे मंत्री एम. टी. रामा राव यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार तो सामाजिक कार्यासाठी नेहमी तयार असतो. कोरोनाशी लढण्यासाठी त्याने मागचा पुढचा विचार न करता आपला दोन महिन्यांचा संपूर्ण पगार दान केला आहे.

एम. टी. रामा राव यांनी केलेलं ट्विट पाहा.

बोन्था साई कुमार हा सध्याच्या आणीबाणीच्या प्रसंगातही आपलं काम करून देशाची सेवा करत आहे. शिवाय त्याने आपल्या मेहनतीचे पैसेही देशाला दान दिलेत. या कामाबद्दल त्याचं कौतुक तर झालंच पाहिजे.

वाचकहो बातमी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required