computer

सॅनिटरी पॅड्स मोफत वाटणारा स्कॉटलंड हा जगातला पहिला देश ठरला!!

स्कॉटलँड या देशाने अतिशय महत्वाचा असा कायदा पास केला आहे. स्कॉटलँड या देशाने त्यांच्या देशातील सर्व महिलांना मासिक पाळी संबंधी सर्व उत्पादनं मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे २०२० साल उजाडून देखील स्कॉटलँड हा देश असे करणारा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे.

स्कॉटलँड देशाने अधिकृत कायदा करून हा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व वयोगटांतील महिलांना या कायद्यानुसार मोफत सॅनिटरी नॅपकिन आणि इतर उत्पादनांचे वाटप करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेसाठी स्कॉटलँडकडून राष्ट्रव्यापी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

या निर्णयातून प्रत्येक महिलेपर्यंत मासिक पाळी दरम्यान लागणाऱ्या वस्तू पोहोचाव्यात हा उद्येश्य असणार आहे. यासाठी उपक्रम राबवण्याची पूर्ण जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असणार आहे. हे विधेयक पास व्हावे यासाठी राजकारणी मोनिका लेनिन यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

मोनिका या स्कॉटिश संसदेत खासदार आहेत. २०१६ पासून त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता. हे विधेयक देखील त्यांनीच संसदेत मांडले होते. याआधी २०१८ साली देखील सर्व शालेय आणि महाविद्यालयीन तरुणींना मासिक पाळीत गरजेच्या असणाऱ्या वस्तू मोफत वाटणारा स्कॉटलंड हा जगातला पहिला देश ठरला होता.

स्कॉटलँडने २०२२ पर्यंत देशातील सर्व सार्वजनिक ठिकाणी मोफत सॅनिटरी पॅडस उपलब्ध करून देण्याचे लक्ष ठेवले आहे. या प्रकारचा पुढारलेला निर्णय स्कॉटलँड देशाकडून घेण्यात आल्यानंतर इतर देशानी देखील या उपक्रमाचे अनुकरण करण्याची गरज आहे. भारताने देखील अशी योजना आणायला हवी का याबद्दल तुमचे मत आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

 

सबस्क्राईब करा

* indicates required