या व्यक्तीच्या पोटातून चक्क ८ चमचे, २ स्क्रूड्रायव्हर, २ टूथब्रश आणि एक चाकू निघाला ??

मंडळी, आज तुम्ही जी बातमी वाचणार आहात ती अविश्वसनीय वाटू शकते हे आधीच सांगून ठेवतो. नंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हालाच शिव्या घालाल.

चला तर,  जास्त वेळ न दवडता बातमी वाचून घ्या.

तर, बातमी अशी आहे की नुकतंच डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून ८ चमचे, २ स्क्रूड्रायव्हर, २ टूथब्रश, एक चाकू, आणि दाराचं लहान कुलूप बाहेर काढलं आहे. हे सगळं एका व्यक्तीच्या पोटात असू शकतं  हो भाऊ.. हे असं प्रत्यक्षात घडलं आहे. हा पाहा त्याच्या पोटातून बाहेर काढलेला ऐवज.

आता गोष्ट ऐका. या व्यक्तीचं नाव आहे करन सेन. तो हिमाचल प्रदेशच्या मंडी भागात राहतो. त्याने काही दिवसापूर्वी पोटावर फोड आल्याची तक्रार केली होती. डॉक्टरांनी पोटाचा एक्सरे काढल्यानंतर त्याच्या पोटात धातूच्या वस्तू असल्याचं आढळलं. डॉक्टरांच्या ३ जणांच्या टीमने मिळून त्याच्या पोटातून या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या आहेत. डॉक्टरांनी या केसला दुर्मिळ म्हटलंय.

आता प्रश्न पडतो हे त्याच्या पोटात आलं कुठून. तपास घेतल्यावर असं आढळून आलं की करन सेनला मानसिक आजार आहे. ह्यामुळेच त्याने या गोष्टी गिळल्या. सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे.

मंडळी, तुमच्या आजूबाजूला अशा अविश्वसनीय गोष्टी घडल्या आहेत का ? आमच्यासोबत त्या शेअर करायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required