computer

खास मराठी स्टाईल मधले १० केक्स !! सांगा बरं यातला कोणता केक तुम्हाला आवडला !!

१७ व्या शतकातल्या युरोपात जर तुम्हाला केक खायचा असेल तर तुमच्या खिश्यात भरगच्च पैसे असणं गरजेचं होतं. धान्य, मध, साखर, विविध फळं अशा घटकांनी बनलेला केक त्याकाळी सगळ्यांनाच परवडणारा नव्हता. खरं तर केक हा पदार्थ सुरुवातीला ब्रेडचं मोडिफिकेशन म्हणून खपला, पण पुढे प्रत्येक पदार्थाच्या बाबतीत होतं तसंच याचं झालं. केकच्या व्हरायटी निघाल्या. केक हा साधा ब्रेड सारखा पदार्थ न राहता त्याला आणखी चविष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती तयार झाल्या.  

स्रोत

१८०० शतकापासून केक सजावटीला महत्व आलं. असं म्हणतात की एका फ्रेंच बेकरीने पहिल्यांदा सजावट असलेला केक बाजारात आणला होता. यामागे केक छान दिसावा हे कारण नसून केक महाग विकला जावा हे कारण होतं. राव काही का असेना केकची सजावट प्रसिद्ध झाली ती झालीच. १८४० च्या दरम्यान नवीनच बाजारात आलेल्या सुरुवातीच्या काळातील साध्या ‘ओव्हन’मुळे केक तयार करणं अगदी सोप्पं झालं होतं. हव्या त्या आकारात हव्या त्या पद्धतीने झटपट केक्स तयार होऊ लागले. तेव्हाच कधीतरी केक हा श्रीमंतांच्या डोक्यावरून सर्वसामान्यांच्या झोळीत पडला असावा.

स्रोत

आजच्या काळात केक सहज उपलब्ध आहे. एवढंच काय केक सजावटही सर्वसामान्य बाब झाली आहे. आता एक नवीन टप्पा गाठला जातोय. केक तयार करण्यात आता शिल्पकला डोकावू लागली आहे. माणसाच्या स्वभाव, आवड, व्यवसाय यानुसार केक तयार केले जात आहेत. उदाहरणच घ्या ना, खूप वर्षांपासून DSLR च्या आकारातील केक सोशल मिडीयावर फिरत आहे. काही वर्षापूर्वी पूनम ढिल्लों च्या बड्डे साठी बनवलेला बियरच्या आकारातील केक व्हायरल झाला होता. आशा ताई, पूनम ढिल्लोंचा फोटो आणि मध्ये ठेवलेला केक असा फोटो तुम्हीही पाहिला असेलच.

स्रोत

तर मंडळी, मर्राठी माणसासाठी सुद्धा केक तयार करण्यात नवीन नवीन प्रयोग होत आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास मराठी ढंगातली केक ज्यांना बघून तुम्हाला त्यांच्या केक असण्यावरच शंका येईल राव. !! पाहा बरं यातला कोणता केक तुम्हाला बनवून घ्यायला आवडेल !!

१. वडापाव केक

२. मिसळपाव केक १

३. पैठणी केक

४. मराठी जोडप्यांसाठी खास

५. पैठणी अन् फेटा केक

६. मिसळपाव केक २

७. खास सरकारी अधिकाऱ्यांसाठी

८. DSLR केक

 खास तुमच्या DSLR धारी मित्रासाठी !!

९. पुलाव

१०. मुंबई-पुणे-मुंबई केक

११. खास तुमच्या आजींसाठी

१२. वर्ल्ड टूर करू इच्छिणाऱ्या कपल्ससाठी

 

मंडळी, तुम्हाला कोणता केक आवडला हे नक्की सांगा आणि हो, मित्रांना tag करायला विसरू नका !!

 

आणखी वाचा : 

बर्थडेला केक का कापतात ? मेणबत्ती का फुंकतात ? वाचा हैप्पी बर्थडेचं लॉजिक !!!

काय म्हणता, 'बेंगलूर अय्यंगार' बेकरी ही खरी बेंगलूर अय्यंगार बेकरी नाहीच आहे ??

सबस्क्राईब करा

* indicates required