पर्वती, तुळशीबाग, अलका टॉकीज आणि बरंच काही...पुण्याची ही १०० चित्रे पाहायलाच हवीत !!

कलाकारांना नवीन कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून इन्स्टाग्रामवर #100DayProject हा हॅशटग सध्या ट्रेंड होतोय. #100DayProject म्हणजे कलाकारांनी त्यांच्या कोणत्याही आवडत्या विषयावर सलग १०० दिवस काम करायचं आणि ते फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करायचे. हा हॅशटग वापरून कोणीही आपली कला इन्स्टाग्रामवर सादर करू शकतो.
एकेकाळच्या कॉर्पोरेट वकील असलेल्या शिखा नंबियार यांनी हा चॅलेंज स्वीकारला होता. त्यांचा पहिला प्रोजेक्ट होता #100DaysOfBangaloreByChica. बंगलोर शहरातील १०० ठिकाणं त्यांनी आपल्या चित्रातून मांडली होती.
दुसऱ्यांदा चॅलेंज हाती घेताना त्यांनी चक्क पुण्याची निवड केली आहे. #100DaysOfPune हा हॅशटग वापरून त्यांनी १०० चित्रांमधून पुणे उभं केलंय.
आपल्या दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करण्याचा अनुभव सांगताना शिखा म्हणाल्या की “मला माहित असलेल्या पुण्यातल्या सर्व ठिकाणांना मी भेटी दिल्या आणि काही नवीन ठिकाणं शोधून काढली. मी पुन्हा एकदा पुण्याच्या प्रेमात पडले आहे.”
मंडळी, त्यांनी तयार केलेली सर्वच्या सर्व चित्रे आम्ही शेअर करू शकत नाही. म्हणून मोजकी २० चित्रे आम्ही घेऊन आलो आहोत. यातल्या कोणकोणत्या ठिकाणांना तुम्ही भेटी दिल्या आहेत ते नक्की सांगा !!