computer

२ तास काहीही न करता बसून राहणाऱ्या पोराचा व्हिडीओ २२ लाख लोकांनी पाहिला !!

लोक एवढे रिकामटेकडे झाले आहेत की काहीही पाहतात असे म्हटलं तर खोटं ठरणार नाही. मध्यंतरी जेसीबीची खुदाई पाहणाऱ्या रिकामटेकड्या गर्दीचे व्हिडिओज व्हायरल झाले होते. पण आज जी गोष्ट सांगणार आहोत ती म्हणजे अभूतपूर्व आहे- पूर्वी असे कधी घडले नाही, पण पुन्हा होणार नाही याची खात्री मात्र देता येणार नाही.

एक माणूस युट्युबवर व्हिडीओ टाकतो. दोन तास तो फक्त बसून राहतो आणि काहीही, अक्षरश: काहीही करत नाही. काहीच म्हणजे काहीच नाही. कॅमेरा लावून भाऊ आरामात बसला आहे. कॅमेऱ्याकडे पाहत आहे. तुम्ही म्हणाल लोकांनी दुर्लक्ष केले असेल. अहं.. दोन तास काही न करणाऱ्या माणसाचा व्हिडीओ लोकांनी पाहिला. किती लोकांनी पाहिला माहितेय?? तब्बल २२ लाख!!!

या भावाचे नाव मोहम्मद दिदीत आहे. गडी इंडोनेशियाचा आहे. त्याने व्हिडिओ टाकला. २ तास काहीच केले नाही. फक्त कॅमेऱ्याकडे बघत बसला. व्हिडिओला टायटल दिले, "२ तास काहीही न करणे". लोकांनी हा व्हिडिओही हिट करून टाकला!!!

त्या व्हिडिओखालच्या कमेंटस् वाचल्या तर मात्र तुमचे हसून हसून पोट दुखेल. कोणी म्हणत आहे तो मेडिटेशन करत आहे, कोणी म्हणतोय तो गाढ विचारांमध्ये असेल, तर काही अतिशहाण्या लोकांनी मोहम्मदने या वेळेत किती वेळा पापण्यांची उघडझाप केले हेसुद्धा मोजलं.

एकंदरीत, काहीतरी करून जे झाले नाही, ते काहीही न करता झाले. गडी जगभरात फेसम झाला....

सबस्क्राईब करा

* indicates required