अहमदाबादच्या महिलेने कार शेणाने का सारवली ???

उन्हापासून वाचण्यासाठी प्रत्येकजण नवनवीन आयडिया शोधून काढतोय, पण अहमदाबादच्या एका बयेनं जे केलंय त्याचा दर्जाच वेगळा आहे. कार थंड राहावी म्हणून तिने कारला शेणाने सरावलंय. जोक नाही राव!! ही फेसबुक पोस्ट पाहा.

मंडळी, आपल्या गावाकडं घराच्या भिंतींना शेणाचा लेप देण्याची फार जुनी पद्धत आहे. ही पद्धत कारसाठी पण वापरली जाऊ शकते हे आज पहिल्यांदा समजलं. अहमदाबादच्या ४५ डिग्री तापमानात कार थंड राहावी म्हणून शेजल शाह हिने ही आयडिया केली आहे.

राव, आता प्रश्न पडतो की कार मध्ये तर AC असतो, मग बाहेरून शेण थापण्याची गरज काय. त्याचं उत्तर काहीसं असं आहे, की जेव्हा आपण कार उन्हात बंद करून जातो तेव्हा आतलं तापमान वाढतं. पुन्हा जेव्हा कर सुरु होते तेव्हा तापमान पूर्ववत होण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो. तोवर खिडक्या उघड्या ठेवून कार थंड होण्याची वाट बघावी लागते. कदाचित हाच विचार करून तिने शेणाचा वापर केला असावा.

स्रोत

पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तर्हेतर्हेचे प्रश्न विचारले आहेत. शेणाने कार थंड तर राहील पण वासाचं काय ? शेणाने कार थंड राहू शकते का ? एकूण किती शेण लागलं ?

तर मंडळी, कशी वाटली ही हटके आयडिया ? तुम्हाला कोणते प्रश्न पडले ??

सबस्क्राईब करा

* indicates required