दूरदर्शनने निवडलेत ५ नवीन लोगो.... तुम्हाला कोणता आवडतो पाहा !!

दूरदर्शनवर लागणाऱ्या अफलातून मालिका जेवढ्या आपल्या लक्षात आहेत तेवढाच लक्षात आहे तो दूरदर्शनचा लोगो. २०१७ साली हा ऐतिहासिक लोगो बदलण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला होता. या निर्णयाला लोकांनी विरोध केला. तरी प्रसार भारतीने लोगोसाठी स्पर्धा घेतली होती. नुकताच या स्पर्धेचा निकाल आलाय.

मंडळी, स्पर्धेत तब्बल १०,००० अर्ज आले होते. यातील एकाला विजेता घोषित करणं अवघड होतं म्हणून प्रसार भारतीने टॉप ५ लोगो निवडले आहेत. यापैकी एक लोगो लवकरच चाचणी म्हणून वापरण्यात येणार आहे.

राव, हे सगळं प्रसार भारती फारच उत्साहाने करत आहे, पण पब्लिकलाच नाही आवडलं तर उपयोग काय ? लोकांना नवीन लोगो आवडलेले नाहीत. त्यांनी प्रसार भारतीचा चांगला खरपूस समाचार घेतलाय. एकाने तर म्हटलंय, “स्पर्धेतून लोगो घेण्यापेक्षा चांगले डिझायनर्स निवडा, त्यांना योग्य मोबदला द्या आणि त्यांच्याकडून संपूर्ण डिझाईन नव्याने तयार करून घ्या.” दुसऱ्या एकाने तर असंही म्हटलं की, “अशी नाचक्की करून घेण्यापेक्षा जुना लोगो वापरा.”

मंडळी, यानिमित्ताने दूरदर्शनचा जुना लोगो आणि दूरदर्शनची थीम पाहून घ्या.

बोभाटा पब्लिक, तुम्हाला हे लोगो आवडले का, की जुना लोगोच चांगला होता ??

 

आणखी वाचा :

गुड न्यूज- देख भाई देख ते शक्तिमान या सगळ्या मालिका दूरदर्शनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर!!

दूरदर्शनवर बातम्या देणारी मंडळी, या चेहऱ्यांना तुम्ही ओळखता का?

स्वाभिमानमुळं पुढे आलेले १० कलाकार. तुम्हांला यातला कुठला कलाकार अधिक आवडतो?

दूरदर्शनवरचे यातले किती व्हिडिओज तुम्हांला आठवताहेत..? चौथं गाणं तर तुम्हांला तोंडपाठ असेल..

सबस्क्राईब करा

* indicates required