व्हिडीओ ऑफ दि डे : चीनी कामगार चक्क १६० फुटावर झोपतात ?? हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच !!

कामाचे तास आणि कामाचं प्रेशर असलं की लोक कामावरच थोडावेळ डुलकी घेतात. हे बऱ्याच ऑफिसेस मधलं चित्र आहे. मेहनतीची कामे करणारे पण दुपारी थोडी झोप घेताना आपण बघितलंच असेल. चीनचे कामगार पण असंच थोडावेळ विश्रांती घेतात, पण चीनी कामगारांची ही वामकुक्षी भलतीच व्हायरल झाली आहे. त्याचं कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा.
मंडळी, चीनचे विद्युत कर्मचारी तब्बल १६० फुटावर झोप घेतात हे पहिल्यांदाच जगासमोर आलंय. एका चीनी साईटने दिलेल्या माहितीनुसार ते दररोज अशाच प्रकारे कामातून ब्रेक घेतात. हे करत असताना ते सुरक्षेची पुरेशी काळजी घ्यायला विसरत नाहीत.
चीनी कामगारांची अशी परिस्थिती का आहे ? याचं कारण म्हणजे या कामगारांना उंचावर काम करावं लागतं. खाली येऊन विश्रांती घ्यायला वेळ नसतो. त्यामुळे ते आहे त्याच ठिकाणी झोप घेतात. असं म्हणतात की एकदा वर गेलेला कामगार फक्त जेवणासाठीच खाली उतरतो.
मंडळी, चीन मध्ये स्वस्तात कामगार उपलब्ध होतात हे आता जगजाहीर आहे. हा व्हिडीओ पाहून तर चीनी कामगार वाटेल त्या परिस्थितीत काम करू शकतात हेही सिद्ध होतं.
सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर फिरतोय. या उंचावरही चीनी कामगारांना झोप लागते याचं लोकांनी कौतुक केलंय. पण काहींनी चीनी कामगारांच्या परिस्थितीबद्दल चिंता पण व्यक्त केली आहे. आता तुमचं मत सांगा मंडळी !!