तिने मेकअपवर बहिष्कार टाकल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी का दिली जात आहे ?

Subscribe to Bobhata

जपान, चीन आणि दक्षिण कोरियासारख्या देशांत मेकअपला खूप म्हणजे खूपच महत्त्व आहे. गोरेपणाचा अटृहास तसा जगभरच आहे, पण इथं त्याही पलिकडे जाऊन तरुण आणि आणखी सुंदर दिसण्यासाठी इतकी सौंदर्यप्रसाधनं वापरली जातात, ते काही विचारुच नका. त्यातही दक्षिण कोरियाला जगाची सौंदर्याची राजधानी म्हटलं जातं. पण आता याच सौंदर्याच्या  राजधानीतल्या  तरुणी मेकअप उतरवत आहेत. 

महिला आणि  मेकअप हे अगदी घट्ट समीकरण असतानासुद्धा या बायका असा मेकअप का उतरवत आहेत?  त हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल ना? तर ऐका... 

स्रोत

चेहऱ्यावरचे मेकअपचे थर पुसून आपण जसे आहोत, तसे इतरांना सामोरे जाण्याची मोहीम दक्षिण कोरियात सुरू झाली आहे. बाईनं सुंदरच दिसलं पाहिजे, असा दक्षिण कोरियात अलिखित नियम. त्यापायी दोन-दोन तास बायका मेकअप करतात. आता मात्र एक नवीन चळवळ सुरु झाली आहे, ती म्हणजे डिस्ट्रॉय मेकअप. अनेक मुली आपलं मेकअप किट नष्ट करत आहेत. त्याचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. 

स्रोत

‘एस्केप द कोर्सेट’ नावाची ही मोहीम आहे. दक्षिण कोरियातील यू-ट्यूब स्टार लीना बी हिने या 'नो मेक-अप' मोहिमेला सुरुवात केली. चेहऱ्यावरचे मेकअप उतरविण्याचे ट्युटोरिअल्स लीनाने यू-ट्युबवर टाकले. ही गोष्ट सहजासहजी स्वीकारली जाणार नाही, याची तिला कल्पना होती. मात्र थेट जीवे मारण्याच्या धमक्या मिळणे हे तिच्यासाठी धक्कादायक होतं. पण २१ वर्षीय लीनाने पूर्ण विचारांती निर्णय घेतला होता. एरवी मेकअप कसा करायचा याचे धडे देणाऱ्यांना 'मेकअप नको' असे प्रमोट करणारा व्हीडिओ अपलोड करणं कितपत पचनी पडेल, याची लीनाला चिंता होती.  

स्रोत

कोरियन महिलांच्या स्वतःला सौंदर्यप्रसाधनांच्या थराखाली दडवायच्या सवयीविरोधात ठामपणे भूमिका घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तिनं  हे पाऊल  उचललं होतं. तिने धाडसाने आपल्या खोटया पापण्या काढतानाचा, गडद लाल रंगाची लिपस्टिक पुसतानाचा व्हिडिओ अपलोड केला. त्यानंतर काही वेळातच पाच लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. काहींनी तिला पाठिंबा दिला, पण बहुतांश जणांनी तिच्यावर टीका दिली. काहींनी तर 'आम्ही तुला शोधून जीवे मारू' अशी धमकीही दिली. " अशा धमक्या मिळाल्यानंतर घराबाहेर पडण्याचीही भीती वाटत होती," असं लीनानं म्हटलंय. दक्षिण कोरियातल्या अनेक तरुण मुली लीना बीच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. पण खरंच महिलांच्या मेकअपच्या सौंदर्यावर खरं सौंदर्य ठरतं का?? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

 

आणखी वाचा :

लोकमान्य टिळक ते संजय दत्त : बॉलिवूडचा मेकअप जादूगार, एकच नाव आपला मराठी छावा 'विक्रम गायकवाड'

हा मेकअप आहे की फोटोशॉप ? तुम्हीच ठरवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required