computer

ऑस्ट्रेलियातील तब्बल ९०,००० प्राण्यांना वाचवणारं कुटुंब !!

ऑस्ट्रेलियातील वणवा गेल्या ४ महिन्यांपासून धगधगतोय. या आगीने माणसांचा तर जीव घेतलाच पण त्याहीपेक्षा जास्त प्राण्यांचा जीव घेतला आहे. जवळजवळ ५० कोटी प्राणी या आगीत भस्म झाले. एक चांगली गोष्ट म्हणजे असंख्य प्राण्यांना लोकांनी आपल्या जीवावर बेतून वाचवलं आहे. आज आपण ज्या लोकांची ओळख करून घेणार आहोत त्यांनी प्राण्यांसाठी आयुष्य वाहून घेतलं आहे.

स्टीव्ह आयर्विन या वाइल्डलाइफ तज्ञाच्या कुटुंबाने नुकतंच ९०,००० वा प्राणी ऑस्ट्रेलियाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल  झाल्याचं सांगितलं आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे हे सगळे प्राणी या एकट्या कुटुंबाने वाचवले आहेत. हा पाहा ९०,००० वा प्राणी.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Robert Irwin (@robertirwinphotography) on

स्टीव्ह आयर्विन हे ऑस्ट्रेलियाचे वन्यजीव जाणकार आणि प्राणिसंग्रहालयाचे मुख्य होते. पूर्वी डिस्कव्हरीवर मगरींबद्दल माहिती देणारा एक तज्ञ दाखवला जायचा. तेच हे स्टीव्ह आयर्विन. त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय हा मगर असल्या कारणाने त्यांना ‘दि क्रोकोडाइल हंटर’ नाव मिळालं होतं. २००६ साली विषारी स्टिंगरे माशामुळे त्यांचा जीव गेला. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या प्राणीप्रेमाची परंपरा त्यांच्या कुटुंबाने चालवली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी अनेक प्राण्यांना वाचवलं. सध्याच्या आणीबाणीच्या काळात देखील ते दिवसरात्र काम करत आहेत. नुकतंच त्यांनी प्लॅटिपस प्राण्याला वाचवलं. हा त्यांनी वाचवलेला ९०,००० वा प्राणी होता. 

त्यांनी वाचवलेले आणखी प्राणी पाहा.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Robert Irwin (@robertirwinphotography) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bindi Irwin (@bindisueirwin) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bindi Irwin (@bindisueirwin) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bindi Irwin (@bindisueirwin) on

आयर्विन कुटुंबाकडून झु हॉस्पिटल चालवलं जातं. गेल्या १६ वर्षांपासून या हॉस्पिटलने आठवड्याचे ७ दिवस आणि दिवसाचे २४ तास प्राण्यांना सेवा पुरवली आहे. माणसांवर ज्या काळजीने उपचार केले जातात त्याच प्रकारे प्राण्यांवर उपचार केले जात आहेत. स्टीव्ह आयर्विन यांचा मुलगा रोबर्ट आयर्विनने म्हटलं आहे की ‘आज प्राण्यांना आपली सर्वात जास्त गरज आहे.’

मंडळी, स्वतःचं आयुष्य वाहून घेऊन एवढी वर्ष प्राण्यांची सेवा करणे खरंच कौतुकास्पद आहे. आयर्विन  कुटुंबाला बोभाटाचा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required