computer

विराट कोहलीच्या चाहत्याने विराटला दिलंय हटके गिफ्ट...व्हिडीओ पाहून घ्या !!

चाहत्यांना आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दलचा आदर दाखवण्यासाठी काहीतरी हटके करायचं असतं. यासाठी ते नवनवीन कल्पना शोधून काढतात. कोणी चित्रं काढतं तर कोणी शरीरावर नाव गोंदवून घेतं. वर्ल्डकपच्यावेळी बुद्धिबळाच्या सोंगट्यांनी धोनीचं चित्र तयार केल्याची बातमी आम्ही दिली होती. विराट कोहलीच्या चाहत्याने पण असाच काहीसा प्रयत्न केला आहे, पण त्याची कल्पना सगळ्यात हटके आहे.

गुवाहाटीच्या राहुल परीक या व्यक्तीने जुन्या फोन्सच्या वेगेवगळ्या भागांना एकत्र करून विराटचं चित्र तयार केलं आहे. लांबून बघितल्यावर चित्र असल्याचा भास होतो, पण जवळून पाहिल्यावर राहुलची कलाकारी दिसून येते. खुद्द बीसीसीआयने राहुलचा व्हिडीओ शेअर केला आहे.

राहुलला हे चित्र पूर्ण करण्यासाठी तीन दिवस आणि तीन रात्री लागल्या. गुवाहाटी येथे होणाऱ्या आगामी भारत श्रीलंका T20I सामन्यांच्या निमित्ताने त्याने हे खास चित्र तयार केलं आहे. स्वतः विराटने राहुलला भेटून त्याचं कौतुक केलं आहे आणि आपला ऑटोग्राफ दिला आहे.

तुम्हाला कशी वाटली ही हटके कल्पना ?