computer

काय म्हणता, दहा मिनिटांत पॅन कार्ड मिळवता येईल ?

बजेटमध्ये सांगितल्याप्रमाणे अर्थमंत्री सीतारामन यांनी तात्काळ पॅन कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आधार कार्डवर आधारित e-kyc च्या आधारे पॅन कार्ड मिळविता येणार आहे. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा आधारशी संलग्न असला पाहिजे.

हे पॅन कार्ड पेपरलेस असणार आहे. त्याचबरोबर हे इ-पॅन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमार्फत मोफत देण्यात येणार आहे. तात्काळ पॅनची ही सुविधा जरी आता सुरू करण्यात आली असली तरी याचे बीटा व्हर्जन फेब्रुवारीमध्येच सुरू करण्यात आले होते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनुसार तेव्हापासून आजवर जवळपास साडेसहा लाख लोकांना पॅन कार्ड देण्यात आले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे ई-पॅन तुम्हाला १० मिनिटांतच मिळू शकणार आहे.

स्रोत

पॅन कार्ड मिळविण्यासाठीची प्रक्रिया खूपच सोपी आहे. तुम्हाला इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन एक फॉर्म भरायचा आहे. तिथे आधार नंबर दिल्यानंतर एक ओटीपी येतो तो जनरेट करावा लागेल. एवढे झाल्यावर एक १५ अंकी नंबर तुम्हाला मिळेल, त्यानंतर तुम्ही तिथूनच ई-पॅन डाऊनलोड करू शकता. तुमच्या इमेलवरसुद्धा ते ई-पॅन पाठविण्यात येणार आहे. 

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार २५ मेपर्यंत एकूण ५० कोटी लोकांना पॅन कार्ड देण्यात आले आहे. 

स्रोत

तुमच्या आधार नबरसोबत पॅन कार्ड जोडणे हे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याची मुदतही ३० जूनपर्यंत देण्यात आली आहे. तर आता एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी पॅन कार्ड काढता येणार असल्याने लवकरात लवकर पॅन काढून घ्या आणि ज्यांना पण पॅन काढायचे असेल त्यांना पण ही माहिती द्या..

सबस्क्राईब करा

* indicates required