व्हॉटसअँप अपडेट : आता स्क्रीनशॉट घेणं बंद....स्टेटस डाऊनलोड करा राव !!

राव, व्हॉटसअँप स्टेटसचं वर्तुळ तर तुमच्या रोज पाहण्यात येत असेल. काही लोक तर अक्षरशः पूर्ण गॅलरी स्टेटस मध्ये ओततात. ही डोके दुखी सोडली तर काहीवेळा एखाद दुसरा चांगला स्टेटस दिसतो आणि आपल्याला तो फोटो किंवा व्हिडीओ हवा असतो. पण व्हॉटसअँप स्टेटसवर फोटो, व्हिडीओ कॉपी किंवा डाऊनलोड करता येत नाही. मग अश्यावेळी आपण काय करतो तर सरळ सरळ स्क्रीनशॉट घेतो किंवा व्हिडीओ असेल तर मित्राकडे मागणी करावी लागते (मित्र प्रत्येकवेळी विनंतीला मन देतातच असं नाही.) 

स्रोत

राव आता असं काहीही करण्याची गरज पडणार नाही. कारण व्हॉटसअँपच्या स्टेटस मध्ये असलेले फोटो आणि व्हिडीओ तुम्हाला डाऊनलोड करता येणार आहेत. तुम्हाला धक्का बसेल पण व्हॉटसअँप यासाठी काहीही करणार नाही तर तुम्हालाच तुमच्या फोन मध्ये अपोआप हा स्टेटस मिळेल. कसं ? चला समजून घेऊया. 

(हे तुम्ही तुमच्या रिस्कवर करा)

आपल्या मोबाईल मध्ये अनेक छुपे फोल्डर्स (hidden folders) असतात. यातलाच एक फोल्डर म्हणजे ‘स्टेटस फोल्डर’. आपल्या मोबाईल मध्ये व्हॉटसअँपची मेसेज फाईल, फोटो, व्हिडीओ, जीआयएफ, डोक्यूमेंट्स इत्यादी जतन करण्यासाठी एक स्वतंत्र फोल्डर असतो. या फोल्डर मध्ये स्टेटस नावाचा आणखी फोल्डर सुद्धा असतो पण हा फोल्डर छुपा असल्याने तो आपल्याला दिसत नाही. या फोल्डर मध्ये आपण पाहिलेले फोटो किंवा व्हिडीओज अपोआप सेव्ह केले जातात. 

आता तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुमच्या फोन गॅलरी मध्ये जाऊन हा फोल्डर अनहाईड करायचा. त्यासाठी काही फोन्स मध्ये अनहाईडचा ऑप्शन दिलेला असतो. जर हा ऑप्शन नसेल तर तुम्ही गुगल प्ले-स्टोर किंवा अॅपल अॅप-स्टोर मध्ये जाऊन वेगळी फोन गॅलरी डाऊनलोड करू शकता. एकदा का तुम्ही फोल्डर अनहाईड केलात की तुम्हाला फोटो आणि व्हिडीओ फोन मध्ये इतरत्र सेव्ह करता येतील. आहे की नाही सोप्प.

मंडळी, एक लक्षात असुद्या, तुम्हाला फक्त फोटो आणि व्हिडीओ डाऊनलोड करता येतील. बाकी टेक्स्टसाठी स्क्रीनशॉट जिंदाबाद.

 

आणखी वाचा :

रेल्वेच्या व्हाट्सऍप हेल्पलाईनला केले या मेसेजेसनी बेजार !!

व्हॉटसअँप अपडेट : व्हॉटसअँपवर ग्रुप व्हिडीओ कॉल कसा करायचा ??

ब्ल्यू व्हेल नंतर आलाय जीवघेणा 'मोमो गेम'....जाणून घ्या काय आहे हा गेम ??

तुम्ही व्हॉट्सऍपवर काय करता ते आता फेसबुकला कळणार, हे टाळण्याचा एक उपाय आहे.

फेसबुक, व्हाट्सअॅप, ट्विटर वापरण्यासाठी लागणार टॅक्स ??...पाहा बरं कोणत्या देशात आहे हा कायदा !!

सबस्क्राईब करा

* indicates required