computer

जास्त उंची असणं आरोग्याला हितकारक नाही असं संशोधन म्हणतं??

उंची कमी असलेल्या लोकांसाठी एक खुशखबर आहे. आजवर उंचीवरून अनेकांना टोमणे मिळाले असतील. कमीपणा वाटला असेल, काहींना तर अपमानसुद्धा सहन करावा लागला असेल. पण आता तुमची पाळी आहे. कारण पण तसेच आहे.

एका शोधानुसार कमी उंची असलेल्या लोकांचे आयुष्यमान जास्त असते. तर आजवर ज्यांनी उंची वाढवण्यासाठी जीव तोडून मेहनत घेतली त्यांची मेहनत वाया गेली की काय असे म्हणायची वेळ आली आहे.

उंची वाढवण्यासाठी लोक किती उपाय करतात! अटकमटक चवळी चटक, उंची वाढत नसेल तर झाडाला लटक!! वेगवेगळी औषधे घ्या, सायकलिंग करा यांसारख्या गोष्टी लोक सर्रास करताना दिसतात. जास्त उंची असणे अनेकार्थाने चांगले मानले जाते. पण डॉक्टरांच्या मते उंची ही शरीरातल्या काही विशेष हार्मोन्समुळे वाढते. त्यामुळे सायकलिंग, पोहणे, लटकणे वगैरे सोडून द्या, पण जर तुम्ही उंची वाढवण्यासाठी औषधे घेत असाल तर ते चांगले नाही. म्हणजे पाहा, पुढच्या एक किंवा दोन वर्षांत तुमची उंची वाढण्यासाठी जे हार्मोन्स कारणीभूत असतात, त्यांना उद्दिपित म्हणजेच स्टिम्युलेट करुन तीच उंची त्याहून कमी काळात वाढवली जाते. पण त्यामुळे इतर हार्मोन्सही उद्दिपित होऊन किंवा मारले जाऊन शरीरात हार्मोनल असंतुलन होऊ शकते.

पण या व्हिडिओत ही व्यक्ती काय म्हणतेय ते जाणून घ्या. त्यांच्यामते एक संशोधन झाले आणि त्या संशोधनानुसार लोकांच्या मरणाची सरासरी काढली तर त्यात कमी उंची असलेल्या लोकांची मरण्याची संख्या कमी असल्याचे म्हटले आहे. ज्यांची उंची साधारण साडेपाच फूट किंवा नेमकं सांगायचं तर ५ फूट ४ इंचांपेक्षा जास्त आहे त्यांची दर इंचाला १.३ वर्षे इतकी वर्षे आयुष्यातुन कमी होतात. काही संशोधनात असंही दिसून आलं आहे की जास्त उंचीच्या लोकांना रक्ताच्या गाठी आणि कर्करोग यांसारख्या रोगांचा धोका असतो.

तर उंची चांगली असणे जरी काही गोष्टींमध्ये चांगले असले म्हणून काय झाले? कमी उंची असणेसुद्धा फायद्याचे आहेच की!! त्यामुळे जिसकी हाईट छोटी उसका भी बडा नाम है, खरं की नाही??

सबस्क्राईब करा

* indicates required