सुरतेला भरतेय पादण्याची स्पर्धा!! कोणकोण जाणार?

तुमच्या जोरदार पादण्याने तुमची खिल्ली उडते का ? कामातले लोक आणि घरचे वैतागलेत का? पादायला आल्यावर तुमची गोची होते का? असं असेल तर निराश होऊ नका. तुमच्यातल्या या अनोख्या ‘नैसर्गिक’ कलागुणाला आता योग्य प्लॅटफॉर्म मिळणार आहे.
मंडळी, भारतात पहिल्यांदाच सुरत येथे “पाद स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचं नाव आहे What The Fart (WTF). जो स्पर्धक सर्वात मोठ्याने, सर्वात जास्त वेळ आणि सुरेल पादेल तो विजेता ठरणार आहे. जिंकणाऱ्याला ट्रॉफी सोबत ५००० ते १५००० पर्यंतचं बक्षीस मिळेल.
या अनोख्या स्पर्धेची कल्पना अभिनेता आणि गायक असलेल्या यतीन संगोई यांची आहे. त्यांना स्वतःच्या अनुभवावरून या स्पर्धेची आयडिया सुचली. ते एकदा आपल्या कुटुंबासोबत सिनेमा पाहायला गेले होते. सिनेमा चालू असताना ते मोठ्याने पादले. लोक त्यांना हसले. त्यांच्या कुटुंबातील एकाने म्हटलं की “जर पादण्याची स्पर्धा असती तर तू पहिला आला असता.” इथेच त्यांना ही कल्पना सुचली.
यतीन म्हणतात की ‘जगभरात अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात, पण भारतात अशी स्पर्धा आजवर झालेली नाही.’
पादणे हा विनोदाचा विषय असतो. सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने पादल्यावर लोक हसतात. काहींना तर पादऱ्या हे नाव पण पडतं. या अशा समज-गैरसमजातून या नैसर्गिक क्रियेला लोक दाबत असतात. या स्पर्धेच्या माध्यमातून यतीन यांना हे समजुती दूर करायच्या आहेत.
तर मंडळी, आता खुल के पादा.. कारण पादल्यावर बक्षीस पण मिळणार आहे. मग कोणकोण या स्पर्धेत भाग घेणार ?
या स्पर्धेबद्दल आणखी माहिती हवी असल्यास या लिंक वर क्लिक करा.
आणखी वाचा :
आता पादा बिन्धास्त; वाचा पादण्याचे सात फायदे...
सहकाऱ्याच्या पादण्याच्या सवयीमुळे त्याने घेतली कोर्टात धाव....मागितली तब्बल एवढी मोठी भरपाई !!