प्रत्येक साडीप्रेमीने फॉलो केलेच पाहिजेत हे १० इन्स्टा अकाऊंटस!!

साडी हा विषयच न संपणारा आहे. सहावारी आणि नऊवारी तर सोडाच, पण प्रत्येक राज्यातली साडी नेसण्याची पद्धत, तिथला कपडा-संस्कृती-डिझाईन्स-रंग-पॅटर्न्स हे सगळं न संपणारं आहे. तुम्हांला माहित आहे का? तुम्ही कितीही जाड आणि बारीक झालात तरी वर्षानुवर्षे तुम्हांला व्यवस्थित येणारा कपडा म्हणजे साडी!! त्यातही जर ती चांगल्या क्वालिटीची असेल, तर मग आजी-पणजीची साडीही तुमच्याकडे वारसाहक्काने यावी इतकी वर्षं ती छान राहाते.
हे साडी प्रकरण आपण देईल त्या फॅशनमध्ये वळतं आणि खुलून तर दिसतंच, पण सगळ्यांच्या नजरेत कौतुक दिसतं ते वेगळंच. आता तुम्हांला साडी वेगळ्या पद्धतीने कशी नेसावी, कशासोबत कसले ब्लाउज आणि ज्वेलरी छान दिसतील यावर विचार करायला कष्ट पडायला नकोत म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत काही इन्स्टाग्राम अकाऊंटस.. हे नुसते फॉलो केले तरी तुम्हांला साडी नेसण्याच्या भन्नाट आणि युनिक आयडियाज मिळतील..
१. Mrs Welde रोल
ही आहे सोन्या.. साडीवर आपले नेहमीचे ब्लाऊज घालावेत असं कोण म्हणतं? कसं दिसेल म्हणता? अहो मग पाहा ना या बाईंच्या इन्स्टा फोटोजमध्ये. आजकाल या सहवारीपेक्षा नऊवारीवर जास्त प्रेम करतात म्हणे. त्यातही एकाच प्रकारच्या साड्या या नेसत नाहीत, वेगवेगळे प्रिंट्स, पोत.. सगळं काही दिसेल तुम्हांला इथे..
२. Sripriya
पारंपारिकपासून ते अगदी ट्रेंडी, वेगवेगळ्या प्रांतांतल्या वेगवेगळ्या साड्या हे जर पाहायचं असेल, तर श्रीप्रियाला फॉलो कराच.
३. Isha Priya Singh
साडी आणि फॅशन याचा सुरेख संगम म्हणजे इशा प्रिया सिंगचं इन्स्टा अकाउंट.
४. Venus
साडी फॅशन्स आणि हेल्दी खाणं या दोन्ही गोष्टी एकत्र हव्या असतील तर the_fashionable_nutritionist ला पर्याय नाही बरं.
५. The Sari Series
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी साड्या कशा नेसल्या जातात आणि त्याता आणखी काय प्रयोग करता येतात हे पाहायचं असेल तर thesariseries पाहाच.
६. Sumitra Selvaraj
आजकाल साडीपेक्षा पंजाबी ड्रेस किंवा वेस्टर्न फॉर्मल्स जास्त वापरले जातात. साहजिकच साड्या रोजच्या वापरासाठी कमी आणि खास प्रसंगासाठी घेतल्या जातात. बरं, या साड्या खूप टिकतात पण ब्लाऊज एक तर टिकत नाहीत आणि टिकले तर बसत नाहीत. दुसऱ्यांची आपल्याला आवडलेली साडी नेसायची असेल तर त्यांचं ब्लाऊज बसेल की नाही सांगता येत नाही. या समस्येवर एकच उत्तर- साडीतला ब्लाऊज न शिवता वेगळ्याच कापडाचा छान ब्लाऊज शिवून घ्यायचा आणि मिक्स अँड मॅच करायचं. शिंप्याला द्यायचे पैसेही वाचतील आणि तुमची हटके फॅशन होईल.
आता कोणत्या साडीवर कोणतं ब्लाऊज चांगलं दिसेल हा प्रश्न पडला असेल तर sareesandstories मदतीला आहेच.
७. RG
मिक्स अँड मॅच ब्लाऊजची फॅशन आणि हँडलूमच्या वेगवेगळ्या साड्या यांचा खजिना आहे life_in_a_saree यांच्याकडे. त्या रोज साडी नेसतात आणि त्यांचं पाहून कुणी साड्या नेसायला लागलं तर त्यांना आनंदच होईल असं त्यांचं म्हणणं आहे.
८. Megha
हे इन्स्टा अकाउंट तुम्हांला साडी वेगवेगळ्या प्रकारे, वेगळ्या ब्लाऊजवर कशी वापरावी हे तर सांगेलच,पण इतरही फॅशन, ब्यूटी, टिप्स आणि इतरही भरपूर माहिती देईल. हे perkymegs अकाऊंट हिंदी आणि इंग्रजीमध्ये युट्यूब चॅनेल्सही चालवतं आणि त्यात शॉपिंगपासून ड्रेसिंग सेन्स कसा वाढवावा याच्या मस्त मस्त टिप्सही देतं.
९. Seemaskt
ही न्यूयॉर्कमध्ये राहणारी साडीवेडी मुलगी आहे. तिनं साड्यांना मॉडर्न ड्रेसमध्ये कसं रुपांतरित केलंय हे पाहाल, तर त्याच्या प्रेमातच पडाल. साडी हे केवळ कापड नाही, ती एक मनातून व्यापून राहणारी भावना आहे हे तुम्ही seemaskt हे इन्स्टा अकाऊंट पाहून मान्य कराल.
१०. डॉली जैन्
या बाईंबद्दल काय बोलावं? या खुद्द अंबानी आणि दिपिका पादुकोणसारख्या सेलेब्रिटींना साड्या नेसवतात आणि त्याची लाखांत फी घेतात म्हणे. आता आपल्याला काय त्यांच्याकडून साडी नेसून घ्यायची नाहीय, पण टिप्स आणि स्टाईल्स घ्यायला काय हरकत आहे?
या डॉलीकाकू म्हणे ३२५ प्रकारे साडी नेसवू शकतात. झालंच तर फुगणारी कांजीवरम, हेवी बनारसी या साड्या कशा नेसाव्यात वगैरे भारी आयडियाज पण देतात. dolly.jain नावाने शोधलंत तर त्यांचं अकाऊंट लगेच सापडेल.
मग, हे सोडून आणखी कुठले इन्स्टा अकाऊंटस तुम्ही साडीसाठी फॉलो करता? आम्हांला नक्की कळवा.
आणखी वाचा :
या बाई प्रियांका चोप्रा, ईशा अंबानी आणि दीपिका पादुकोणला साडी नेसवतात....असं घडलं त्यांचं करिअर !!
तुमचा वॉर्डरोब सजवा जॅकेट ब्लाऊजसोबत.. पाहा जॅकेट ब्लाऊजचे एक से बढकर एक १३ प्रकार..
तुमच्या सुंदर रेशमी साड्यांना पुन्हा उपयोगात आणण्याच्या ८ हटके आयडिया..
तुमच्या सुंदर साड्यांना पुन्हा उपयोगात आणायच्या २५ सॉलीड आयडियाज..
या १० प्रकारच्या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात
या सीझनमध्ये ट्राय करायलाच हवेत हे ६ बेस्ट इंडियन लूक्स.. ५व्या लूकच्या तर तुम्ही प्रेमातच पडाल!!
पाच सेकंदात नेसून होते ही साडी....कशी वाटली ही आयडिया?
रेशमाचे धागे ते साडी -पाहा प्रवास
सासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने !!