नवीन मतदारांनो अजूनही संधी गेली नाही आजच्या आज नाव नोंदवा !!

११ एप्रिल २०१९ पासून निवडणुका सुरु होत आहेत. मतदानास पात्र मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत नक्कीच नोंदवलं असणार, पण ज्यांनी नाव नोंदवलेलं नाही त्यांना वाटत असेल की आपला चान्स तर गेला राव. निवडणूक अगदी जवळ आली असताना आता कुठे नाव नोंदवता येणार ?
मंडळी, आज आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर आणली आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीय राव. राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलनुसार (NVSP) उमेदवार नोंदणीच्या शेवटच्या तारखेपूर्वी १० दिवस अगोदर तुम्हाला नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करता येऊ शकते. २० मार्च नंतर तुमच्या मतदान ओळखपत्रात कोणताही बदल करता येणार नाही, पण नवीन मतदार नोंदणी सुरूच राहणार आहे.
मंडळी, लोकसभा निवडणुका ७ टप्प्यांमध्ये होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात सुरुवातीच्या ४ टप्प्यात मतदान होणार आहे. आता आपण पाहूया उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि त्यानुसार मतदान यादीत नाव नोंदवण्याची शेवटची तारीख कोणती आहे ते.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ आणि २६ मार्च आहे. म्हणजे नवीन मतदारांना १५ मार्च पर्यंत अर्ज भरणं आवश्यक होतं. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या मतदारांना नाव नोंदणीची संधी गेलेली आहे.
आता वळूया तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याकडे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही ४ एप्रिल असणार आहे. म्हणजे तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या मतदारांना उद्या म्हणजे २४ मार्च ही नाव नोंदणीची शेवटची तारीख असेल. चौथ्या टप्प्यातील उमेदवारांसाठी ९ एप्रिल ही शेवटची तारीख असेल. याचा अर्थ मतदारांना २९ मार्च ही नाव नोंदणीसाठीची शेवटची तारीख असेल.
मंडळी, आता पाहूयात महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कुठे मतदान होणार आहे ते.
पहिला टप्पा – ११ एप्रिल २०१९
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम.
दुसरा टप्पा - १८ एप्रिल २०१९
बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर.
तिसरा टप्पा – २३ एप्रिल २०१९
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
चौथा टप्पा - २९ एप्रिल २०१९
नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर,शिर्डी.
मंडळी, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात येणाऱ्या शहरातील मतदारांनाच फक्त नाव नोंदणी करता येणार आहे. आता पाहूया नाव नोंदणी कशी करायची ते.
नाव नोंदणी कशी करायची ?
राव, तारीख समजली पण नाव नोंदणी कशी करायची ? त्यासाठी https://www.nvsp.in/Forms/Forms/form6?lang=en-GB या वेबसाईटवर जाऊन तुम्ही Form 6 भरू शकता. Form 6 मध्ये विचारलेली माहिती आणि आवश्यक ते कागदपत्र पाठवले की सहज नाव नोंदणी होऊ शकते.
याखेरीज तुम्हाला ऑफलाईन नाव नोंदणी करायची असेल तर तुम्ही Form 6 भरून तुमच्या जवळच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडे देऊ शकता. नाव नोंदणीसाठी तुमचा पासपोर्ट साईज फोटो, जन्माचा दाखला, निवासाचा पुरावा आवश्यक असतो. ही कागदपत्र आणि Form 6 भरून दिल्यानंतर तुमची नवीन मतदार म्हणून नोंदणी होते.
मग वाट कसली बघताय. तुम्ही जर अजून नाव नोंदणी केली नसेल तर लगेचच करून घ्या. मतदानाचा हक्क आपण प्रत्येकाने बजावायलाच हवा.
तुम्ही कोणत्या भागातून आहात सांगा बरं !!
आणखी वाचा :
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? इथे क्लिक करा आणि जाणून घ्या !!!
देशातली पहिली निवडणूक चक्क ५ महिने चालली.. वाचा तेव्हा काय घडलं याचे किस्से!!
अच्छे दाग वाली ही शाई येते तरी कूठून : या घेऊया शाईचा मागोवा