व्हिडीओ ऑफ दि डे : बिबट्याच्या पिल्लाची आणि आईची हृदयस्पर्शी भेट !!

आजच्या महिलादिनी आम्ही एका हृदयस्पर्शी घटनेबद्दल सांगणार आहोत. आपल्या आईपासून हरवलेल्या बिबट्याच्या पिल्लाला त्याच्या आईकडे सुखरूप पोहोचवण्यात Wildlife SOS संस्थेला यश आलं आहे. हा पाहा व्हिडीओ.

मंडळी, हे ९ आठवड्यांचं पिल्लू पुण्याजवळच्या नागपूर गावी एका उसाच्या शेताजवळ सापडलं होतं. वनविभागाने त्याची वैद्यकीय चाचणी केली. चाचणीत पिल्लू निरोगी असल्याचं दिसून आलं. मग वनविभाग आणि Wildlife SOS संस्थेने मिळून त्याला पुन्हा त्याच्या आईकडे यशस्वीपणे सुपूर्द केलं.

पिल्लू ज्या शेताजवळ सापडलं होतं तिथून जवळ असलेल्या जंगलाजवळ पिल्लाला ठेवण्यात आलं. Wildlife SOS संस्थेच्या रिमोट कंट्रोल कॅमेऱ्यांनी त्याच्यावर नजर ठेवली होती. काही तास वाट पाहिल्यानंतर पिल्लाची आई तिथे आली आणि पिल्लाला घेऊन गेली.

या कामात पुढाकार घेणारी Wildlife SOS ही संस्था नॉन-प्रॉफिट संस्था आहे. भारतातील वन्यजीवांना वाचवणे आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम ही संस्था करते. त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required