computer

जेव्हा पंजाबच्या मुख्यमंत्र्याची बायकोच चोरांना ATM कार्डची गोपनीय माहिती सांगते..

बँकेतून बोलतोय असं सांगून लोकांना चुना लावला जातो हे आता सर्वश्रुत आहे, त्यामुळे असा फोन आलाच तर लोक फोन ठेवून देतात. ही अगदी साधी गोष्ट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नींना मात्र माहित नाहीय. मित्रानो, त्यांना एका ठगाने तब्बल २३ लाखांना गंडवलंय.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि पतियाळाच्या खासदार प्रेणीत कौर यांना एक फोन कॉल आला होता. फोनवरच्या व्यक्तीने आपण एका राष्ट्रीयकृत बँकेतून बोलतोय असं सांगितलं. त्याने म्हटलं की मला तुमचा पगार तुमच्या खात्यात जमा करायचा आहे. त्याने बोलण्याच्या ओघात प्रेणीत कौर यांचा बँक अकाऊन्ट नंबर, ATM पिन नंबर, CVV  नंबर आणि OTP सुद्धा मिळवला.

प्रेणीत कौर यांना थोड्याचवेळात SMS आला की त्यांच्या खात्यातून २३ लाख रुपये काढण्यात आलेत. तेव्हा कुठे बाईंची ट्यूब पेटली.

यांनतर पोलीसांच एक पथक कामाला लागलं. हा शोध झारखंडच्या रांची येथपर्यंत जाऊन पोचला. तिथून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय..