computer

एक GIF तुमचा व्हॉट्सॲप हॅक करू शकते... तुमच्याकडे व्हॉट्सॲपचं कोणतं व्हर्जन आहे पाहा !!

मंडळी जर तुम्ही तुमचे व्हॉट्सॲप अपटेड केले नसेल तर लवकर करून घ्या. कारण सेक्युरिटी रिसर्चरने एका बगचा शोध लावला आहे जो तुमच्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ आणि मेसेज चोरी करू शकतो. यासाठी त्यांना काही विशेष करावे लागत नाही राव!! एक GIF फाईल तुम्हाला पाठवून त्याच्या माध्यमातून त्यांचे काम फत्ते करता येते. ते कसे ते बघूया.

सिक्युरिटी रिसर्चर्सच्या म्हणण्यानुसार हा धोका डबल फ्री बगमुळे ओढवला आहे. थोडक्यात, ही प्रोग्रॅमिंगची एरर आहे. या GIF च्या माध्यमातून हॅकर्स तुमच्या मोबाईलमधील डेटाचे ऍक्सेस मिळवतात. पण व्हॉट्सॲपने ही गोष्ट नाकारली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मागच्या महिन्यातच त्यांनी ही समस्या सोडविली आहे. तरीही त्यांनी नविन व्हर्जन अपडेट करून घ्यायला सांगितले आहे. सिक्युरिटी तज्ञांच्या म्हणण्यानुसार जुन्या व्हर्जनला धोका आहे.

हे gif तुमच्या मोबाईलमध्ये दोन मार्गांनी घुसू शकते, एक म्हणजे ते तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इंस्टॉल असले पाहिजे. या ऍपच्या माध्यमातून ते gif तयार होते आणि ते तुमच्या व्हॉट्सॲपमधील डेटा चोरी करते. दुसरे म्हणजे हे gif मॅसेज, इमेल किंवा एखाद्या ऍपच्या माध्यमातून सुद्धा येऊ शकते. जसे तुम्ही ते gif उघडून बघितले की तुमच्या फोनचा ऍक्सेस हॅकर्सला मिळतो.

यापासून वाचण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमचे व्हॉट्सॲप अपडेट करून घ्या. नविन व्हर्जन या धोक्यापासून मुक्त आहे.

आपण अपडेटेड व्हर्जन वापरात आहोत की नाही हे कसं बघणार ?

१. त्यासाठी आधी सेटिंग ऑप्शनमध्ये जा.

२. त्यानंतर Help वर क्लिक करा.

३. त्यानंतर Help मेन्यूमधून App Info वर क्लिक करा.

App Info वर क्लिक केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सॲपचं कोणतं व्हर्जन वापरताय हे दिसेल. जर तुमचं व्हर्जन 2.19.244 पेक्षा कमी असेल तर लगेचच अपडेट करून घ्या. व्हॉट्सॲपच्या 2.19.244 व्हर्जन खालील सगळे व्हर्जन धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे.

 

लेखक : वैभव पाटील