computer

'फूड चेन' : 'केएफसी' आणि केएफसीला जन्म देणाऱ्या आजोबांची गोष्ट !!

फूड चेनच्या मागच्या भागांमध्ये आपण डॉमिनोज पिझ्झा आणि पिझ्झा हट या जगातल्या दोन बलाढ्य पिझ्झा कंपन्यांबद्दल जाणून घेतलं. आज जाणून घेऊया ‘केएफसी’बद्दल....

केंटूकी फ्राईड चिकन तुम्हाला माहित आहे का ? आता असे म्हटल्यावर चटकन लक्षात येणार नाही, पण केएफसी म्हटल्यावर तुमच्या लगेच लक्षात येईल. होय हीच ती आपल्या आगळ्या वेगळ्या चिकन साठी प्रसिद्ध असणारी कंपनी.

आज केएफसी रेस्टॉरंट प्रत्येक मोठ्या शहरात आढळतात पण याची सुरुवात केंटूकी नावाच्या अमेरिकेमधील शहरात १९३० मध्ये झाली होती. अनेक व्यवसायात अपयश आल्यामुळे शेवटचा उपाय म्हणून हारलँड सँडर्स या वयस्कर माणसाने रस्त्याच्या बाजूला चिकन फ्रायची गाडी टाकली होती. त्यावेळी त्याने विचारही केला नव्हता की त्याचा ब्रँड भविष्यात १२३ देशात जाऊन पोहोचणार आहे.

आजही केएफसी च्या लोगोवर सँडर्सचा फोटो तुम्हाला दिसेल. लोकांना आपले वेगळ्या पद्धतीने फ्राय केलेले चिकन आवडते हे सँडर्सच्या लक्षात आल्यावर त्याने व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली आणि आपली पहिली फ्रांचायजी १९५२ मध्ये दिली. त्यानंतर एकामागोमाग एक अशी केएफसी स्टोअर्स अनेक शहरात उभी राहू लागली. व्यवसाय इतका वाढला की वयोमानामुळे सँडर्सला तो झेपेनासा झाला. मग आपली कंपनी त्याने 1964 मध्ये जॉन ब्राऊन आणि जॅक मेसी यांना विकून टाकली आणि निवृत्ती स्वीकारली.

 

केएफसी ही जागतिक पातळीवर विस्तार करणारी पहिली अमेरिकन कंपनी म्हणून ओळखली जाते. १९९७ साली बकेट मध्ये चिकनचे मोठे पीस सर्व्ह करण्याची पद्धत सुरू झाली ती आजतागायत तशीच टिकून आहे. 1990 पर्यंत हा एकमेव पदार्थ केएफसी मध्ये मिळत असे. परंतु नंतर मात्र सँडविच, सलाड आणि सॉफ्ट ड्रिंक्स सुद्धा मिळू लागले. आज जगभरात १२३ देशात मिळून केएफसीचे २०,००० रेस्टॉरंटस ग्राहकांना त्यांचे सिक्रेट रेसिपीवाले चिकन खाऊ घालत आहेत.

 

लेखक : अनुप कुलकर्णी

 

आणखी वाचा :

'फूड चेन' : पिझ्झा हट आणि झोपडीचा काय संबंध आहे ? वाचा पिझ्झा हटच्या जन्माची गोष्ट !!

'फूड चेन' : आजच्या पहिल्या लेखात वाचा 'डॉमिनोज पिझ्झा'च्या जन्माची गोष्ट !!

सबस्क्राईब करा

* indicates required