computer

३५० खून करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा क्रूर सिरियल किलर तुरुंगातून सहज मोकळा सुटला!!

गुन्हेगारी जगतातील अनेक घटना सामान्य लोकांना हादरवून सोडण्यास पुरेशा असतात. अतिशय नृशंसपणे एखादं कृत्य करणारे लोक किती थंड रक्ताचे असतील हा विचार करूनही घाबरायला होते. काही माथेफिरू एकामागे एक असे खून करत असतात. सिरीयल किलर या नावाने ओळखले जाणारे हे लोक एकसारखे खून करत सुटतात आणि शेवटी कित्येक आयुष्य उध्वस्त केल्यावर त्यांना तुरुंगात डांबणे शक्य होते. आज ज्या सिरीयल किलरची कहाणी तुम्ही वाचणार आहात, तो जगातील सर्वाधिक जास्त खून करणाऱ्या सिरीयल किलरपैकी एक आहे.

दक्षिण अमेरिकेत कोलंबिया नावाचा देश आहे. तोच तो, कुख्यात ड्रग डीलर पाब्लो इस्किबार आणि नार्कोस मालिकावाला देश. मॉंस्टर ऑफ द एन्ड्स या नावाने कुख्यात असलेल्या कोलंबियाचा पेड्रो लेपोज हा फक्त मर्डरर नव्हता, तर तो रेपिस्टदेखील होता. त्याने फक्त ९ ते १२ या चिमुकल्या वयोगटांत असणाऱ्या कोलंबिया, परु(पेरु) आणि इक्वाडोरमधल्या मुलींचे खून केले होते. १९८० साली त्याला अटक झाली तेव्हा त्याच्यावर ११० खुनांचे आरोप होते. पण पकडला गेल्यावर त्याने स्वतः तब्बल ३५० खून केल्याचे कबूल केले. यावरून तो किती भयंकर क्रूरकर्मा असेल याचा अंदाज येऊ शकतो.

पेड्रो लेपोजची गोष्ट सुरू होते १९६९ सालापासून. तेव्हा त्याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने त्याच्यावर बलात्कार करणाऱ्या ४ माणसांचा खून केला. सूड म्हणून केलेल्या या दोन खुनांनंतर तो थांबला नाही. त्याच्या तोंडाला आता रक्त लागले होते. गरीब घरांतील लहान मुलींना त्याने शिकार करणे सुरू केले. हे सिरीयल किलर कितीही माथेफिरू वाटत असले तरी आपल्या गुन्हे करताना ते अतिशय चपळाई दाखवत असतात.

पेड्रो सेल्समन बनण्याचे नाटक करत असे. आपण रस्ता विसरलो असे नाटक करून तो लहान मुलींना जाळ्यात ओढत असे. नंतर त्यांचे अपहरण करून त्यांना तो मारून टाकत असे. १९८० साली कोलंबियामध्ये आलेल्या पुरात त्याने मारून टाकलेल्या कित्येक लोकांचे सांगाडे सापडले होते. पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केली होती, तेव्हा त्याने सांगितले होते की तो अधिकांश इक्वाडोरच्या म्हणजे शेजारच्या देशातल्या लहान मुलांचे अपहरण करत असे. कारण ही मुले त्याला आवडत होती, आता आवडणाऱ्या मुलांचे खून करणे म्हणजे वेडेपणाच म्हणायचा. पण अनेक सिरीयल किलर्स हे मनोरुग्ण असतात हेही तितकेच खरे.

१९६९ पासून जरी त्याचे गुन्हे सुरू झाले असले तरी त्याचा इतिहास मोठा आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पेड्रोचे लहानपण विचित्र परिस्थितीत गेले होते. मेक्सिको विद्यापीठातील डिर्क गिब्सन यांनी सिरीयल किलर अराउंड द वर्ल्ड या पुस्तकात पेड्रोचे वर्णन केले आहे. तो फक्त ८ वर्षांचा असताना स्वतःच्याच बहिणीवर वाईट नजर ठेवताना त्याच्या आईने त्याला पकडले आणि घराबाहेर काढले. त्याचे दुर्दैव म्हणजे त्याचा सांभाळ अशा माणसाकडे आला ज्याने त्याचे लहान वयात लैंगिक शोषण केले.

आता त्याच्या मदतीला एक अमेरिकन जोडपे आले. पण तिथेही तो टिकला नाही, त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले आणि पुढे मग तो तुरुंगात गेला. तिथेही त्याच्यावर बलात्कार होऊन तो गुन्हेगारी कृत्यांकडे वळला. त्याने एके ठिकाणी सांगितले होते की त्याच्या आईने त्याच्यासोबत जो व्यवहार केला त्याचा बदला म्हणून त्याने इतके खून केले. गिब्सन आपल्या पुस्तकात लिहितात की ज्यांचा तो खून करत असे, ती मुलं एकतर विकली गेलेली असत किंवा मानवी तस्करीतून त्यांना दुसरीकडे पाठवण्यात येत असे. पेड्रो अशा मुलांना शोधून त्यांचे खून करत असे.

त्याचा तपास लागला त्याचे धागे वर सांगितल्याप्रमाणे कोलंबियातल्या पुरात सापडले. जेव्हा चार मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर आले तेव्हा पोलिसांनी खुन्याचा शोध सुरु केला. तेव्हाच पेड्रो आणखी एका लहान मुलीला खून करण्यासाठी घेऊन जात असतानाच त्याला पोलिसांनी पकडले. तिथेच त्याने सर्व खुनांची कबुली दिली. तो स्वतः पोलिसांना त्याने खून करून लोकांना जिथे पुरले होते तिथे घेऊन गेला. जिथे ५० हून अधिक लोक पुरले होते अशा आणखी काही जागा त्याने दाखवल्या. डॉ गिब्सन सांगतात की त्याने सांगितलेला आकडा अतिशयोक्ती वाटतो कारण या लोकांना अधिकाधिक खून केल्याचे सांगून स्वताला अधिक भयंकर दाखवायचे असते. तरीही त्याने कमीतकमी ११० खून केल्याचे सिद्ध झाले होते.

पुढे इक्वाडोरच्या कायद्याप्रमाणे त्याला १६ वर्षांची शिक्षा झाली. पण शिक्षा पूर्ण होण्याच्या २ वर्षं आधीच १९९४ साली त्याची सुटका झाली. त्याने केलेल्या ११० खुनांसाठी त्याला प्रत्येकी फक्त १ महिने शिक्षा झाली असे म्हणता येईल. तसेच जो आकडा त्याने स्वतः सांगितला होता तो खरा मानला तर ही शिक्षा अजूनच कमी होते.

१९९५ साली त्याला मनोरुग्ण घोषित करून त्याला उपचारासाठी पाठवण्यात आले होते. तिथून त्याला ३ वर्षांनी सोडण्यात आले. पुढे २००२ साली तो अजून एका खुनाच्या आरोपात गुंतला. यावेळी मात्र पुरेसे पुरावे सापडू शकले नाहीत. डॉ गिब्सन सांगतात एक सिरीयल किलर तोवर खून करणे थांबवत नाही जोवर त्याला थांबवले जात नाही. कोलंबियाच्या मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमधून त्याला १९९८ मध्ये सोडण्यात आले. त्यानंतरचा त्याचा ठावठिकाणा कुणाला माहित नाही.

पेड्रो लेपोज हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भयंकर असा सिरीयल किलर म्हणून आजही ओळखला जातो. तर सर्वात मोठा सिरीयल किलर म्हणून ल्युस ग्राविटो याची ओळख आहे.

उदय पाटील

 

 

सायनाईड मल्लिका...भारतातली पहिली महिला सिरियल किलर !!

 

१६ वर्षे न सापडलेला गुन्हेगार क्रिमिनल प्रोफाईलींगच्या आधारे ४ तासांत असा शोधला!!

 

दीड वर्षांत १० खून आणि दरोड्यांनी हादरवून टाकणाऱ्या पुण्याच्या जोशी-अभ्यंकर केसचे भयानक सत्य आणि तपास वाचा या खास लेखात...

 

केरळ सिरीयल मर्डर : या प्रेमळ दिसणाऱ्या बाईनं १४ वर्षांत एकाच कुटुंबातल्या ६ जणांचा खून केलाय..

 

४३ निष्पाप आणि निरागस लेकरांचं हत्याकांड या तिघींनी का केलं? कारण जाणून तुम्हांलाही राग येईल !!

 

६५० मुलींच्या हत्या करून गिनीज बुकमध्ये स्थान मिळवणारी सिरीयल किलर बाई !!

 

तब्बल ५१ वर्षांनी अमेरिकेला हादरवून सोडणाऱ्या झोडियाक किलरच्या सांकेतिक पत्राचं कोडं सोडवण्यात यश आलंय !!

सबस्क्राईब करा

* indicates required