computer

व्हिडीओ ऑफ दि डे: ATM मशीनचा वापर करून तुमच्या पैशांवर डल्ला कसा मारला जाऊ शकतो? हे प्रात्यक्षिक पाहा !!

सामान्य मध्यमवर्गीय माणसासाठी कष्टाने कमावलेल्या पैशांचे महत्व किती असते ते वेगळे सांगण्याची गरज नाही. एवढे वर्ष थोडे थोडे जमा केलेले पैसे जेव्हा बँक बंद पडली म्हणून किंवा इंटरनेटवर फसवणूक झाली म्हणून एका रात्रीत गमावून बसण्याची वेळ येते तेव्हा काय परिस्थिती ओढवते हे आपण बघितलं असेलच. जर बँक आणि इंटरनेट बँकिंग दोन्ही सुरक्षित नसतील तर जायचे तरी कुठे हा प्रश्न पडणे साहजिक आहे.

या काळजीत भर पाडणारा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. हा व्हिडीओ दाखवून देत आहे की एटीएममधून पैसे काढणे कसे असुरक्षित आहे. या व्हिडिओत दयानंद कांबळे नावाचे एक पोलीस अधिकारी दिसत आहेत. बनावटी कार्डच्या माध्यमातून कसे तुमच्या एटीएमची कॉपी करून पैसे काढणे शक्य आहे हे ते प्रत्यक्ष दाखवत आहेत.

त्यांनी संगीतले की आपण जिथे कार्ड इन्सर्ट करतो तिथे त्याच प्रकारचा बनावटी पॅनल जोडलेला असतो. हा पॅनल तुमच्या कार्डची माहिती चोरतो. चोरी करण्यासाठी दुसरा पॅनल किपॅडच्या वरती बसवलेला असतो. या पॅनलला जोडलेल्या कॅमेऱ्यामुळे तुमचा पिनक्रमांक चोरला जातो. अशा प्रकारे तुमच्या कार्डची माहिती आणि तुमचा पिन क्रमांक चोरून तुमच्या खात्यावर डल्ला मारला जातो.

तर वाचकहो, पुढच्या वेळी ATM मध्ये पैसे काढायला जाल तेव्हा दयानंद कांबळे यांनी सांगितलेल्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आपल्या मेहनतीची कमाई कोणी चोर लंपास करू नये.

 

आणखी वाचा:

ATM वर डल्ला : ATM 'स्कीमिंग' म्हणजे काय ? ते कसे ओळखाल ? त्यापासून सावध राहण्यासाठी काय कराल ?

सबस्क्राईब करा

* indicates required