computer

या रेल्वे चालकाचं सगळे कौतुक का करत आहेत ? व्हिडीओ पाहा !!

रेल्वे अपघातात होणाऱ्या हत्तींच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्यावर्षी नॅशनल जिओग्राफिकने या समस्येवर डॉक्युमेंटरी तयार केली होती. या बातम्या कमी झाल्या असं वाटत असतानाच काही दिवसांपूर्वी एका अपघाताची बातमी आली. पश्चिम बंगालमध्ये रेल्वेने हत्तीला धडक दिली होती. गंभीर जखमांमुळे काही तासातच हत्तीचा मृत्यू झाला.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर कालच्या बातमीचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे. बंगलाच्या नगरकाटा – चालसा दरम्यानच्या रेल्वे मार्गावर हत्तींचा कळप फिरत होता. ट्रेनचे चालक असलेले उत्तम बरुआ आणि डी.डी.कुमार यांनी हत्तींना बघितल्यावर लगेचच इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली. वेळीच ट्रेन थांबल्याने हत्तींचा जीव वाचला. यावेळचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

चालक उत्तम बरुआ आणि डी.डी.कुमार यांच्या प्रसंगावधानाचं लोक कौतुक करत आहेत. खरं तर या आधीच्या घटनेत ज्या हत्तीचा मृत्यू झाला त्यालाही वाचवण्याचा चालकाने पूर्ण प्रयत्न केला होता, पण रेल्वेचा वेग एवढा होता की चालकही हतबल झाला.

तर मंडळी, जाता जाता नॅशनल जिओग्राफिकची ही डॉक्युमेंटरी बघूया.

सबस्क्राईब करा

* indicates required