f
computer

साउथ आफ्रिकेतले सिंह जगतायत कुत्र्यांचं जिणं...त्यांच्या या परिस्थिती मागचं कारण काय ?

सिंह म्हणजे  दहशत आहे. सिंहाचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर जंगलाचा राजा अशीच प्रतिमा उभी राहते. दक्षिण आफ्रिकेत मात्र हाच सिंह दयनीय अवस्थेत आहे. एक सिंह असता तर प्रश्न तेवढा गंभीर झाला नसता, पण इथे तर १०० च्या वर सिंहांची हीच परिस्थिती आहे. काय आहे साऊथ आफ्रिकेतल्या सिंहांची अवस्था ? चला पाहूया.

प्राण्यांच्या समस्येवर आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या दि डोडो या वेबसाईटने एक गुप्त तपास मोहीम आखली होती. या मोहिमेद्वारे त्यांनी  दक्षिण आफ्रिकेतल्या “breeding farm” च्या आतलं सत्य बाहेर काढलं आहे. पुढे आणखी जाणून घेण्यापूर्वी आपण breeding farm म्हणजे काय ते पाहूया.

breeding farm म्हणजे जिथे प्राण्यांच्या प्रजातीची वाढ केली जाते, अशी जागा. साऊथ आफ्रिकेचंच उदाहरण घेतलं तर Pienika Farm या breeding farm ची उभारणी सिहांच्या प्रजातीची वाढ करण्यासाठी झाली होती.

दि डोडोच्या तपासानुसार Pienika Farm मधील तब्बल १०० सिंह मेंज नावाच्या त्वचारोगाला बळी पडले आहेत. मेंज त्वचारोगात प्राण्याच्या शरीरावरचा केसाळ भाग झडतो आणि त्याजागी आतली त्वचा दिसू लागते. आपल्याकडच्या बऱ्याच भटक्या कुत्र्यांना हा आजार झाल्याचं आढळून येईल.

पण सिंह म्हणजे भटका कुत्रा नव्हे. Pienika Farm मध्ये  रोगावर इलाज करण्याऐवजी सिंहांना तशाच अवस्थेत ठेवण्यात आलं आहे. गंमत म्हणजे सिंहाचा सांभाळ आणि त्यांची वाढ हाच breeding farm चा उद्देश असतो.

मंडळी, ही झाली एका breeding farmची परिस्थिती.  दक्षिण आफ्रिकेत असे आणखी breeding farm आहेत जिथलं चित्र यापेक्षा वेगळं नाही. आजकाल तिथे breeding farm हा एक व्यवसाय झाला आहे. आकडेवारीनुसार साऊथ आफ्रिकेत ३००० सिंह आहेत. यापैकी सर्वाधिक सिंह breeding farm मध्ये आहेत. बरेचसे मेंजने ग्रस्त आहेत. ज्यांना मेंज झालेला नाही तेही काही चांगल्या अवस्थेत आहेत असं नाही. अन्न आणि पाण्याचा अभावामुळे त्यांची परिस्थिती पण दयनीय आहे.

मंडळी, साऊथ आफ्रिकेतील सिंह यापूर्वी शिकारीला बळी पडले होते. त्यांना मारून त्यांची हाडे पारंपारिक औषध निर्मितीसाठी आशियात पाठवली जायची किंवा त्यांना जिवंत पकडून अमेरिकेला पाठवलं जायचं. अमेरिकेत त्यांना अशा जागी ठेवलं जायचं जिथे माणसं त्यांना मारण्याचा आनंद लुटू शकतील.

मंडळी, एक संकट टळलं आणि दुसरं उगवलं अशी अवस्था या सिंहांची झाली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required