computer

काय? मुलांना जन्म देऊ नका?? काय आहे ‘चाईल्ड फ्री’ आंदोलन ??

तुम्ही जर गँग्स ऑफ वासेपूर बघितला असेल तर तुम्हाला ‘परमिसन’चं महत्व नक्कीच समजलेलं असणार. मंडप उभारायचा झाला तर पालिकेकडून परवानगी मागितली जाते, लग्न करायचं झालं तर मुलाकडून/मुलीकडून होकार मिळवावा लागतो, कोणाच्या घरी जाताना ‘येऊ का’ म्हटलं जातं, घरात काही काम काढायचं म्हटलं तर सोसायटीला आधी कळवावं लागतं, दुसऱ्यांवर परिणाम होईल अशी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्याला ‘परमिसन’ घ्यावी लागते, पण कधी बाळाच्या जन्मासाठी बाळाकडूनच परवानगी मागितल्याचं ऐकलंय का ?

भाऊ नया है यह !! एक नवीन “जन्म विरोधी” चळवळीचं खूळ लोकांमध्ये पसरत आहे. या चळवळीचं तत्वज्ञान असं सांगतं की ‘जन्म देणे म्हणजे एक प्रकारे दुसऱ्यावर आयुष्य लादण्यासारखं असतं’. कोणाही मानवाला इतर मानवावर आयुष्य लादण्याचा हक्क नसतो असं ही चळवळ सांगते.

या चळवळीचं नाव आहे ‘स्टॉप मेकिंग बेबीज’ ज्याला मानवी विलुप्तता आंदोलनही म्हटलं जात आहे. या चळवळीचं एकंच ब्रीदवाक्य आहे ‘मुलांना जन्म देऊ नका’. १० फेब्रुवारीला चळवळीचे कार्यकर्ते बंगलोर मध्ये पहिली ‘राष्ट्रीय’ सभा घेणार असून आंदोलनही करणार आहेत. आंदोलनकर्त्यांना “चाईल्ड फ्री” म्हणजे बालक विरहित समाज तयार करायचा आहे.

मंडळी, हा काय येडचाप प्रकार आहे असं जर वाटत असेल तर थांबा !! सगळ्यांनाच हा प्रकार येडचाप वाटत नाहीय बरं का. मुंबईच्या राफेल सॅम्युअल या व्यक्तीने हा प्रकार एवढा गंभीरपणे घेतला आहे की तो आता आपल्या आईवडिलांना कोर्टात खेचणार आहे. कारण काय तर त्याच्या परवानगी शिवाय त्याला जन्म देण्यात आला. बोला आता !!!

एका अहवालानुसार अनेक तरुणांनी मुलाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला आहे. चळवळीतले कार्यकर्ते अशी इच्छा राखणाऱ्या तरुणांना पूर्ण पाठींबा देणार आहेत.

तर मंडळी, काय वाटतं या नवीन प्रकाराबद्दल ?? सांगा बरं !!

सबस्क्राईब करा

* indicates required