लाखो प्रयत्नानंतर मिळतो हा परफेक्ट शॉट....हा फोटो एकदा पाहाच !!
मंडळी, फोटोग्राफीमध्ये परफेक्ट वेळ महत्वाची असते. या बरोबर कॅमेराने वेळीच तो क्षण टिपला तर अफलातून फोटो मिळतो. स्टीव्ह बिरो या फोटोग्राफरच्या १० वर्षाच्या करियरमध्ये असाच एक क्षण आला होता. त्याने या क्षणी जो फोटो टिपला तो लाखात एक आहे.
पाण्यावरून झेपावणारा गरुड, त्याचे पंख बरोबर पाण्यावर टेकलेले आणि या सगळ्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब अप्रतिमरीत्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. राव, हा एक दुर्मिळ फोटो आहे.
स्टीव्ह बिरोने हा फोटो ४ मे रोजी कॅनडाच्या कॅनेडियन राफ्टर कंझर्वेंसी येथे घेतला होता. गरुड पाण्यावरून उडत येतोय असा शॉट त्याला पाहिजे होता. त्यासाठी तो तासभर पाण्याजवळ बसून राहिला. अखेर जेव्हा गरुड तिथे आला तेव्हा त्याने लागोपाठ १०० फोटोग्राफ्स क्लिक केले. तो म्हणतो की “गरुडाच्या चेहऱ्यावरचा राग दुर्लक्षित करून मी फोटो घेत राहिलो.”
मंडळी, स्टीव्हने ठरवलेलं की त्याला जर हा परफेक्ट शॉट हवा असेल तर त्याला थोडं जवळ जावं लागेल, पण जेव्हा हा क्षण आला तेव्हा गरुडाच्या पंखांच्या वाऱ्यानेच त्याच्या मनात धडकी भरली. शेवटी त्याने धोका पत्करून फोटो घेतलाच. सुदैवाने गरुडाने पोज दिल्यानंतर त्याच्यावर हल्ला केला नाही.
मंडळी, या क्षणी टिपलेले इतर फोटोग्राफ्स पण बघू घ्या.
कसा वाटला हा परफेक्ट शॉट ? तुमच्याकडे पण असाच एखादा परफेक्ट शॉट असेल तर आमच्या सोबत नक्की शेअर करा !!
आणखी वाचा :
६ वर्ष आणि ७,२०,००० फोटोनंतर मिळाला हा 'परफेक्ट' क्लिक!!
एक छांदिष्ट वाइल्ड लाइफ फोटोग्राफर सांगताहेत जंगलातल्या गमतीजमती…
हे फोटो बघून तुमचा सोशल मिडियावरुन विश्वास उडेल मंडळी !!!
हे २६ फोटो तुम्हांला सांगतील जगातली प्रत्येक स्त्री का सुंदर असते...तुम्हांला काय वाटतं ?
याला म्हणतात परफेक्ट क्लिक...फोटोग्राफी करण्याआधी हे २० फोटो बघून घ्या राव!!




