computer

राष्ट्रीय विज्ञान दिन : विज्ञानाशी निगडीत बोभाटाचे १० टॉप लेख !!

सी. व्ही. रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ हा आपला महत्वपूर्ण शोध जगासमोर ठेवला तो दिवस म्हणजे २८ फेब्रुवारी १९२८. याच शोधासाठी त्यांना पुढे प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं. ‘रामन इफेक्ट’ची आठवण म्हणून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

मंडळी, बोभाटा तुमच्यासाठी नेहमीच विज्ञानाशी निगडीत लेख आणत असतं. आज आम्ही विज्ञान दिनाच्या निमित्ताने बोभाटाचे निवडक असे १० लेख घेऊन आलो आहोत. चला तर आजच्या विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपल्या ज्ञानात थोडी भर घालूया.

१. आपण आपल्या मेंदूचा नक्की किती भाग वापरतो ?

आपल्याला लहानपणी शास्त्रज्ञांची एक गोष्ट सांगितली जायची. आपण सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा माणूस आपल्या मेंदूचा फक्त १० टक्के वापर करतो, पण हे शास्त्रज्ञलोक आपल्या मेंदूचा ११, १२, १३, टक्के वापर करतात. म्हणून ते शास्त्रज्ञ असतात. तुम्ही जर तुमच्या मेंदूचा १०% पेक्षा जास्त वापर करू शकलात, तर तुम्ही आईनस्टाईन किंवा न्यूटनसारखे व्हाल. ऐकलीय ना ही गोष्ट?

या लिंकवर क्लिक करून पूर्ण लेख वाचा.

आपण आपल्या मेंदूचा नक्की किती भाग वापरतो ? वाचून 'दिमाग का दही' नक्कीच होणार नाही पाहा !!

२. आपला डोळा किती मेगापिक्सल असतो ??

मोबाईलचा कॅमेरा जितका भारी तितका आपला मोबाईल भारी राव. ८ मेगापिक्सेल, १२ मेगापिक्सेल, १५ मेगापिक्सेल पण त्या कॅमेऱ्याचं काय जो आपल्याला जन्मजात मिळाला आहे ? म्हणजे आपले डोळे राव. आपले हे दोन कॅमेरे किती मेगापिक्सेल असावेत ? तुम्हाला काय वाटतं ? डोक्यावर जास्त जोर नका देऊ. आम्हीच सांगतो.

या लिंकवर क्लिक करून पूर्ण लेख वाचा.

आपला डोळा किती मेगापिक्सल असतो ?? माहित आहे का भाऊ !!

३. टूथब्रश किती महिन्यांनी बदलावा ?

भारतात दात घासण्याचा ब्रश निरुपयोगी झाला तरी त्याचे अनेक फायदे आहेत. ते काही वेगळं सांगायला नको. पण हा ब्रश निरुपयोगी झालाय किंवा त्याच्या जागी नवीन ब्रश घ्यावा लागेल हे कसं ठरवणार ? आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, ‘दिवसातून २ वेळा दात घासले पाहिजेत’. पण ब्रश किती काळाने बदलायचा हे कोण सांगणार ? राव विज्ञानाकडे याचं उत्तर आहे. 

या लिंकवर क्लिक करून पूर्ण लेख वाचा.

टूथब्रश किती महिन्यांनी बदलावा ? बघा विज्ञान काय सांगतंय !!

४. या 3 प्रयोगातून स्वप्नांना कंट्रोल करा

राव, झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवर आपलं कोणतंही नियंत्रण नसतं. ही बाब आता जुनी झाली आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नांना काबूत ठेवू शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे फिरवू शकता, आपल्याला हवं ते बघू शकता....पण कसं ? विज्ञानाकडे याचं उत्तर आहे !!

या लिंकवर क्लिक करून पूर्ण लेख वाचा.

या 3 प्रयोगातून तुम्ही तुमच्या स्वप्नांना कंट्रोल करू शकता राव !!

५. मानवी शरीरातल्या या चार गोष्टींचा खरंतर माणसाला आता बिल्कुल उपयोग नाही..

उत्क्रांती होऊन माकडाचा माणूस झाला. हे व्हायला हजारो वर्षं जावी लागली खरी. अन् ते होताना शरीरात बरेच बदलही घडले. आधीची शेपूट गळून पडली, आणखीही बरंच काय काय झालंच. पण त्यानंतरही पूर्वी  अत्यंत उपयुक्त असणाऱ्या काही गोष्टी अजून आपल्या शरीरात शिल्लक आहेत, पण आता त्यांचा  सध्याच्या आयुष्यात काहीच उपयोग नाहीय. जाणून घेऊयात काय आहे हे प्रकरण...

या लिंकवर क्लिक करून पूर्ण लेख वाचा.

मानवी शरीरातल्या या चार गोष्टींचा खरंतर माणसाला आता बिल्कुल उपयोग नाही..

६. या विशिष्ट आवाजांनी होणाऱ्या त्रासाला हे आहे वैज्ञानिक कारण !!

शाळेत खडूने लिहिताना किंवा बेंच सरकवताना होणारा आवाज हा अंगावर काटे उभा करणारा असायचा. एखाद्या धातूवरून अणकुचीदार वस्तूने ओरखडा काढणे, सुई ने काचेवर रेघोट्या ओढणे किंवा कागद फाटण्याचा आवाज असेल, या आवाजांच्या नुसत्या विचाराने देखील त्रास होतो. पण मंडळी हा प्रश्न लहानपणापासून पडत आलेला आहे की या ठराविक आवाजांनी आपल्या मेंदूची तार का सटकते ?

या लिंकवर क्लिक करून पूर्ण लेख वाचा.

या विशिष्ट आवाजांनी होणाऱ्या त्रासाला हे आहे वैज्ञानिक कारण !!

७. विज्ञान माहित आहे, पण वैज्ञानिक शोध कसे लिहायचे याचा शोध कुणी लावला हे तुम्हांला नक्कीच माहित नसेल...

मंडळी, इतिहास हा अनेक अज्ञात हिरोंनी भरलेला आहे. काहींचं नावंच कधी इतिहासात लिहिलं गेलं नाही, काहींचं काम इतरांच्या नावावर चिकटलं तर काहींना जाणूनबुजून इतिहासातून वगळण्यात आलं. आता आपल्या जवळचंच उदाहरण बघा ना. शिवकर तळपदे यांनी पहिलं विमान तयार केलं असं म्हटलं जातं. पण आज इतिहासाच्या पुस्तकात ‘राइट बंधु’चं नाव वाचायला मिळतं. आता यात किती तथ्य आहे याच्या खोलात आम्ही जाणार नाही. मुद्दा फक्त एवढाच इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये नेहमीची वाट सोडून थोड्या आडवाटेने गेलो की असे अनेक अज्ञात हिरो सापडतात. आज अशाच एका ‘अज्ञात हिरो’ला आपण भेटणार आहोत.

या लिंकवर क्लिक करून पूर्ण लेख वाचा.

विज्ञान माहित आहे, पण वैज्ञानिक शोध कसे लिहायचे याचा शोध कुणी लावला हे तुम्हांला नक्कीच माहित नसेल...

८. पृथ्वीवर चक्क माणूसच एलियन आहे ??

मंडळी, आपले शास्त्रज्ञ मंडळी अनेक वर्षांपासून एलियन्सच्या शोधात आहे. या एलियन संकल्पनेने कितीतरी अचाट गोष्टींना जन्म दिला. सिनेमे वगैरे आहेतच ओ पण लोक खऱ्या आयुष्यातही एलियन्सना बघितल्याचा दावा करतात. ते हिस्टरीवाल्यांनी तर कसल्या कसल्या थियरी मांडून लोकांना भंडावून सोडलं.

आता एक नवीन थियरी आली आहे. या थियरीने आपल्या सगळ्यांनाच एक जबरदस्त झटका मिळणार आहे.

या लिंकवर क्लिक करून पूर्ण लेख वाचा.

काय सांगता ? पृथ्वीवर चक्क माणूसच एलियन आहे ??

 

९. पृथ्वीबद्दल या १० रंजक गोष्टी माहित आहेत का ?

ज्या ग्रहावर आपण राहत आहोत त्या पृथ्वीबद्दल आपल्याला आजही अनेक गोष्टी माहित नाहीत. तंत्रज्ञान बदललं, संशोधन प्रगत झालं, नवीन गोष्टींचा उलगडा होत गेला, पण.. तरीही पृथ्वी अजूनही माणसाला तिच्या रहस्यांमुळे अचंबित करत आहे. दिवसेंदिवस तिच्याबद्दल नवनवी माहिती समोर येत आहे. अशीच काही रंजक माहिती आम्ही आज घेऊन आलो आहोत.

या लिंकवर क्लिक करून पूर्ण लेख वाचा.

पृथ्वीबद्दल या १० रंजक गोष्टी माहित आहेत का ?

१०. जिभेची जखम पटकन बरी होण्याचं हे आहे रहस्य !!

घाई घाईत अन्न चावत असताना अचानक आपल्याच दातांनी आपली जीभ चावली जाते. जिभेला जखम होते, रक्त सुद्धा येतं. पण काय कमाल आहे राव, सकाळ पर्यंत जीभ अगदी ठणठणीत झालेली असते. आपल्या हातांना किंवा पायाला झालेली जखम भरून यायला काही दिवस तरी लागतातच पण जिभेची जखम एका रात्रीत कशी बरी होते ? विचार केलाय कधी ?

या लिंकवर क्लिक करून पूर्ण लेख वाचा.

जिभेची जखम पटकन बरी होण्याचं हे आहे रहस्य !!

 

मंडळी, कसे वाटले सगळे लेख ? प्रतिक्रीया नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required