बोभाटाची बाग - भाग १ -नागकेशर

हे असं नेहेमीच घडतं ! बरीच माणसं आपण चेहेर्‍यांनी ओळखतो पण नावानी नाही .
उदाहरणार्थ ,अगदी कट्टर नाशिकवाल्यांना बुधा हलवाई कोण असं विचारा तो चारचौघात तुमचा अपमान करेल पण तुम्ही त्याला विचारा बुधा हलवायाचं आडनाव काय ?

तर तो मान खाली घालून म्हणेल माहीती नाही बॉ ! 

पेडर रोडवर राहणार्‍या माणसाला गोपाळराव हरी देशमुख पूल कुठेय ते विचारा , तो तुम्हाला वेड्यात काढेल .

खरं म्हणजे पेडर रोडवरचाओव्हर ब्रीज म्हणजेच गोपाळराव हरी देशमुख पूल ! 

हे फक्त माणसांच्या बाबतीत होतं असं नाही. 

रोज नजरेस पडणार्‍या सगळ्याच वस्तूंबद्दल होत असतंय . 

जाऊ द्या , सध्याच्या या बंदीवासात आपण थोडं निसर्गाकडे जाऊ या ! 


आम्ही तुम्हाला अगदी तुमच्या ओळखीची फूलं दाखवतो , त्यांची माहीती देतो .

फोटो बघून फूल आठवेल पण नाव आठवणार नाही .

चला तर बोभाटाच्या बागेत एक फेरफटका मारू या !


पांढर्‍याशुभ्र पाकळ्या आणि मध्यभागी पिवळ्या धम्मक केसरांचा गुच्छ असलेल्या फुलाचं नाव आहे Poached Egg Flower कारण त्याचं रुप अर्धंकच्चं शिजवलेल्या अंड्यासारखं दिसतं म्हणून ! 
या फुलाला एक मोहक थोडासा मादक गंध असतो.

काहीजणांना हे फूल त्याच्या रुप रंग गंधामुळे आवडतं . 


ही झाडं डेरेदार असल्यामुळे आणि गुलाबीसर पानांमुळे बागेची शोभा वाढवतात.


वैदूंना त्याच्या औषधी गुणांमुळे हे झाड आवडतं.


त्याचं लाकूड दणकट असतंय त्यामुळे या झाडाला आयर्न वूड म्हणतात.

   
आपल्या मराठीत या फूलाला नागकेशराचं फूल म्हणतात. 


एक गुपचुप माहीती- हे फूल चांदीच्या डबीत ठेवून गल्ल्यात ठेवलंत तर गल्ला भरभरून वाहतो म्हणे . बघा काय जमतंय का ? आम्हाला नाही जमलं कारण बोभाटाकडे गल्लाच नाहीय्ये !!

लेखीका -अंजना देवस्थळे

सबस्क्राईब करा

* indicates required