भारत विरुद्ध आयर्लंड मालिकेत भारताला गवसले ३ कोहिनूर हिरे, येणाऱ्या काळात ठरू शकतात मॅचविनर..

भारतीय संघाने (Indian team) आयर्लंड संघाला आयर्लंडमध्ये (Ireland) जाऊन पराभूत केलं आहे. दोन्ही संघांमध्ये २ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने एकतर्फी जिंकला होता. तर मंगळवारी (२८ जून) झालेल्या दुसऱ्या टी -२० सामन्यात दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. शेवटच्या षटकात भारतीय संघाने बाजी मारली आणि ४ धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघाने मालिका २-० ने आपल्या खिशात घातली. युवा खेळाडू असलेल्या या संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याच्या हाती सोपवण्यात आले होते. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली. तर काही खेळाडू देखील होते ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कोण आहेत ते ३ खेळाडू? चला जाणून घेऊया.

)दीपक हुड्डा :

 उजव्या हाताचा फलंदाज दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने पदार्पण केल्यापासून लक्षवेधी कामगिरी केली आहे. मात्र आयर्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेपूर्वी त्याला खूप कमी संधी मिळाली होती. मात्र संधी मिळताच त्याने संधीचे सोने केले. ओपनिंग आणि मिडल ऑर्डरमध्ये देखील त्याने धावांचा पाऊस पाडला. पहिल्या टी -२० सामन्यात त्याने ओपनिंग करताना ४७ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या टी -२० सामन्यात त्याने १०४ धावा केल्या. यासह तो टी -२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी शतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे.

) संजू सॅमसन :

संजू सॅमसनने (Sanju Samson) २०१५ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. मात्र त्याला देखील खूप कमी संधी मिळाली. आयर्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेत संधी मिळताच त्याने दाखवून दिलं की, त्याला भारतीय संघात संधी देण्याची मागणी का केली जाते. त्याने आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी -२० सामन्यात ७७ धावा जोडल्या. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार मारले. ही त्याची टी -२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे. तसेच त्याने दीपक हुड्डा सोबत मिळून १७६ धावांची भागीदारी केली. ही भारतीय संघासाठी टी -२० क्रिकेटमधील सर्वात मोठी भागीदारी आहे.

) उमरान मलिक :

आयर्लंड विरुद्ध भारत मालिका सुरू होण्यापूर्वी उमरान मलिकच्या (Umran malik) पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू होती. आयपीएल २०२२ स्पर्धेत उमरान मलिकने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचीच मनं जिंकली होती. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली होती. ताशी १५० किमी वेगाने चेंडू टाकणाऱ्या या गोलंदाजाला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संधी मिळाली होती मात्र त्याला केवळ १ शतक गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या टी -२० सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीने भारतीय संघाला सामना जिंकून दिला.

हे तिन्ही खेळाडू येणाऱ्या काळात भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतात.

सबस्क्राईब करा

* indicates required