वयाच्या १६ व्या वर्षी सोडली शाळा आता आहे ४३७२ कोटींचा मालक; वाचा रॉजर फेडररच्या आयुष्यातील ५ खास गोष्टी...

टेनिसचा सम्राट रॉजर फेडररने (Roger Federer) अखेर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. २० ग्रँड स्लॅमवर आपले नाव कोरणाऱ्या या दिग्गजाने गुरुवारी (१५ सप्टेंबर) ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. वयाच्या २१ व्या वर्षी विम्बल्डन जिंकणाऱ्या या खेळाडूने आपल्या कारकिर्दीत १०३ वेळेस एटीपी ( असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स)एकेरी जेतेपद पटकावले होते. तसेच विक्रमी ८ वेळेस विम्बल्डन जिंकणारा तो एकमेव टेनिसपटू आहे. त्याने आपल्या नावावर अनेक मोठ मोठे विक्रम केले आहेत. तब्बल ३१० आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी टिकून राहणं सोपी गोष्ट नाहीये. मात्र विक्रमांच्या पलीकडे आज आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी सांगणार आहोत. चला तर पाहूया.(things to know about Roger Federer)

१) रॉजर फेडररकडे दोन देशांचे नागरिकत्व आहे. त्याच्याकडे स्वित्झर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे नागरिकत्व आहे. त्याचे वडील स्वित्झर्लंडचे तर आई दक्षिण आफ्रिकेची आहे.

२) रॉजर फेडररने वयाच्या १६ व्या वर्षी शाळा सोडली होती. कारण त्याला टेनिस खेळात पुढे जायचे होते. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने पहिली विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला एक गाय भेट म्हणून मिळाली होती. तिचे नाव त्याने ज्युलियट असे ठेवले होते.

३) रॉजर फेडरर हा सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. त्याची संपत्ती एकूण ४३७२ कोटी रुपये इतकी आहे. तसेच त्याने आपल्या कारकीर्दीत १३० मिलियन डॉलर रक्कम बक्षिस म्हणून मिळवली आहे.

४) रॉजर फेडररला ९ भाषा येतात. ज्यामध्ये इंग्रजी, स्विस जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन या भाषेचा समावेश आहे. तसेच त्याला आफ्रिकन भाषा देखील येते.

५) रॉजर फेडररच्या कारकिर्दीतील सर्वात खास आणि वेगळी गोष्ट म्हणजे तो कधीच सराव सामना जिंकला नाहीये. सराव करत असताना तो अनेकदा पराभूत झाला आहे. तो सराव करताना कमी आणि सामन्यात जोर लावायचा. फेडररने स्वतः अनेक मुलाखतींमध्ये कबूल केले की त्याला प्रशिक्षण आवडत नाही.

काही दिवसांपूर्वीच टेनिसची दिग्गज खेळाडू सेरेना विल्यम्सने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता रॉजर फेडरर निवृत्त झाल्यानंतर अनेक टेनिस चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required