व्हिडीओ ऑफ दि डे : धोनीने चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट केली....काय घडलं नेमकं??

मंडळी, विरोधी गट कमकुवत आणि वेळोवेळी माती खाणारा असेल तर एखाद्याला आनंदच होईल. कारण याचा आपल्याला फायदाच होणार असतो, पण धोनीच्या बाबतीत वेगळं आहे राव. हा पाहा व्हिडीओ...

त्याचं झालं असं, की काल भारतविरुद्ध बांगलादेश वॉर्म-अप सामना सुरु होता. मैदानावर आपले धोनी भाऊ होते. ३९ वा बॉल टाकण्यासाठी बांगलादेशचा शब्बीर रहमान आला. बॉल टाकणारच,  इतक्यात धोनीने त्याला थांबवलं आणि चक्क फिल्डिंग सुधारण्याचा सल्ला दिला. आश्चर्य म्हणजे शब्बीर रहमानने त्याचं ऐकून एका फिल्डरची जागा बदलली.

स्रोत

राव, बांगलादेशची टीम लवकरच वर्ल्डकपसाठी खेळणार आहे आणि त्यांच्या फिल्डिंगची ही अवस्था आहे. बाकी धोनी भाऊंना क्रिकेट क्षेत्रात किती रिस्पेक्ट आहे हे यावरूनच दिसतं.

तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडीओ? धोनी भाऊंबद्दल काय म्हणाल?

 

सबस्क्राईब करा

* indicates required