computer

भयपट आवडत असतील तर हे ७ झॉम्बी सिनेमे बघायलाच हवेत !!

रामसे फिल्म्स, आहट आणि असे हॉरर शो पाहणाऱ्यांसाठी हा लेख आहे.  हॉरर मूव्हीज म्हणजेच भयपटांमधला सगळ्यात मुख्य घटक म्हणजे झॉम्बीज!! काळोख्या रात्री स्क्रीनवर माणसांच्या मेंदूंसाठी आसुसलेले, भयंकर दिसणारे  झॉम्बीज बघून अंगावर काटा न उठला तरच नवल!! म्हणून आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ७ सुपरहिट झॉम्बी फिल्म्स!!!

पण मंडळी, आधी आपण झॉम्बीजबद्दल थोडी माहिती घेऊ. झॉम्बी म्हणजे हलतीचालती मृत शरीरं. ह्या संकल्पनेची मुळं हैतीयन संस्कृतीत आढळतात. झॉम्बी हा चेटकिणींचा दास असतो, असा समज हैतीयन संस्कृतीत होता. मात्र झॉम्बीला नरभक्षक करण्याची कल्पना जॉर्ज रोमेरो ह्या चित्रपटनिर्मात्याची. त्याने प्रथम ‘झॉम्बी हा माणसांचं मांस खातो’ असं त्याच्या नाईट ऑफ द लिव्हिंग डेड (Night Of The Living Dead) ह्या चित्रपटात दाखवलं आणि झॉम्बीजना एक नवीन रूप दिलं. पुढे १९८५ सालच्या Return Of The Living Dead मधे माणसांच्या मांसांऐवजी माणसांचा मेंदू हे समीकरण दाखवलं गेलं. आज ही दोन्ही समीकरणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत...

आता वळूया ७ सुपरहिट झॉम्बी फिल्म्सकडे !!!

१) राईज ऑफ द झॉम्बीज (Rise Of The Zombies) - साल २०१२

जेव्हा एका भयंकर विषाणूचा पाण्यात शिरकाव होतो आणि माणसांचं झॉम्बीजमधे रूपांतर होतं, तेव्हा शास्त्रज्ञांची टीम तिथून निर्जन बेटावर कसा पळ काढते आणि सर्व झॉम्बीजचा कसा बंदोबस्त करते याची थरारक कहाणी !!

२) आय ॲम लीजंड (I Am Legend) - साल २००७

सगळ्या झॉम्बीजना एकटा भिडणारा आणि त्यातून सहीसलामत वाचणारा हिरो, त्याची रोमांचक कहाणी!! विल स्मिथच्या दमदार अभिनयाने चित्रपटात मजा आणली आहे.

३) ट्रेन टू बुसान (Train To Busan) - साल २०१६

जेव्हा एका धावत्या ट्रेनमधे झॉम्बीजचं आक्रमण होतं, तेव्हा काय काय राडे होतात त्याचा थरारक अनुभव देणारी फिल्म.....

४) शॉन ऑफ द डेड (Shaun Of The Dead)- साल २००४

शॉन हा आपला हिरो एका सामान्य सेल्समनचं जिणं जगत असतो. पण जेव्हा झॉम्बीजचं आक्रमण होतं, तेव्हा ह्या सामान्य माणसाचं जग कसं बदलतं, ह्याची ही भयप्रद तेवढीच विनोदी कथा. संकटसमयी सामान्य माणसाचं एका हिरोमधे रूपांतर होऊ शकतं, हा संदेश आपल्याला ह्या सिनेमातून सतत मिळतो....

५) वॉर्म बॉडीज (Warm Bodies) - साल २०१३

ही फिल्म म्हणजे चक्क मनुष्य आणि झॉम्बी यांची प्रेमकथा आहे भाऊ!! एक झॉम्बी एका मुलीच्या प्रेमात पडतो व पुढे तिच्या मदतीने पुन्हा माणूस कसा बनतो, याची ह्रदयद्रावक कहाणी हा सिनेमा मांडतो. प्रेमामुळे कोणाचाही कायापालट करता येतो, हे सत्य यातून मांडलं जातं.

६) झॉम्बीलॅंड (Zombieland) - साल २००९

जेव्हा झॉम्बीजने वेढलेल्या प्रदेशात जीवनमरणाचा प्रश्न उद्भवतो, तेव्हा.....एकच उपाय...... कत्तल. बघायलाच हवी अशी मूव्ही.

७) मॅगी (Maggie) - साल २०१५

ही आहे एका असहाय्य बाप आणि मुलीची कथा. त्याच्या मुलीचं झॉम्बीमधे रूपांतर होतं, तरीही तो शेवटपर्यंत स्वत:च्या मुलीची काळजी घेतो. कधी नव्हे ते आपल्या डोळ्यात झॉम्बी फिल्म बघताना पाणी येतं..........

तर या फिल्म्स बघा आणि आवडल्यास जरूर कळवा!! पुढच्या वेळी आणखीन उत्तम फिल्म्ससकट भेटू!!!  

 

लेखक : प्रथमेश बिवलकर

 

आणखी वाचा :

हिंमत असेल तर हे १० हॉरर सिनेमे एकट्याने बघून दाखवाच!!

लॉरेन आणि अॅडवर्ड वॉरेन.....कॉंज्यूरिंग आणि अॅनबेल भयपटांचे खरे हिरो !!