भारताची विजयी सुरुवात! लंकेवर मिळवला २ धावांनी विजय...

भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत श्रीलंका संघावर २ धावांनी विजय मिळवला आहे. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. मुंबईच्या मैदानावर २ खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिलाच सामना खेळत असलेल्या शिवम मावी (Shivam mavi) याने जोरदार कामगिरी करत श्रीलंकन फलंदाजी आक्रमणाचे कंबरडे मोडले. तर दीपक हुड्डा या सामन्याचा हिरो ठरला.(India vs srilanka) 

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १६२ धावा केल्या होत्या. १६२ धावा या धावा वानखेडेच्या मैदानावर खूप कमी आहेत. कारण छोट्या मैदानावर धावांचा पाठलाग करणं सोपं आहे. मात्र भारतीय फलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेने देखील शेवटी जोर लावला मात्र एकीकडे फलंदाज बाद होत असताना हे आव्हान पूर्ण करण्यात श्रीलंका संघ अपयशी ठरला. त्यामुळे श्रीलंका संघाला वर्षाची सुरुवात पराभवाने करावी लागली आहे.

आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या शिवम मावीने ४ षटकात २२ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. तर उमरान मलिकने २ गडी बाद केले. या दोन्ही गोलंदाजीने श्रीलंका संघाला पूर्णपणे बॅकफूटवर टाकले होते. तर प्रथम फलंदाजी करताना दीपक हुड्डाने २३ चेंडूंचा सामना करत १ चौकार आणि ४ षटकारांचा मदतीने ४१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला १६२ धावांपर्यंत मजल मारता आली.

शेवटच्या षटकात काय घडलं?

शेवटच्या षटकात श्रीलंका संघाला विजय मिळवण्यासाठी १३ धावांची आवश्यकता होती. अक्षर पटेलने दबावात येऊन पहिलाच चेंडू वाइड टाकला. पुढील चेंडूवर १ धाव तर पुढील चेंडू निर्धाव राहिला. तिसऱ्या चेंडूवर षटकार लागल्याने सामन्याचा रोमांच वाढला. तर चौथा चेंडू निर्धाव आणि पाचव्या चेंडूवर एक धाव घेण्यात आली. शेवटच्या चेंडूवर देखील एकही धाव घेता आली नाही. हा सामना भारतीय संघाने २ धावांनी आपल्या नावे केला.

सबस्क्राईब करा

* indicates required