भारतीय मूळच्या 'या' खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या देशाचे केले आहे नेतृत्व, पाहा यादी

भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. इथे क्रिकेट पाहणाऱ्यांपेक्षा क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या कित्येक पटाने अधिक आहे. १३० कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या देशात कोट्यवधी क्रिकेटपटू आहेत मात्र संधी मिळते ती केवळ ११ खेळाडूंना. तरीदेखील खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिवस रात्र झटत असतात. ज्या खेळाडूंना देशासाठी खेळण्याची संधी मिळते ते खेळाडू संघात स्थान कायम ठेवण्यासाठी मेहनत घेत असतात. तर ज्या खेळाडूंना संधी मिळत नाही, ते देश सोडून जाण्याचा निर्णय घेत असतात. असे अनेक खेळाडू ज्यांनी भारत देश सोडून अमेरिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज सारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. या लेखात आम्ही तुम्हाला अशा खेळाडुंबद्दल माहिती देणार आहोत, जे मूळचे भारतीय होते परंतु पुढे जाऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या देशाचे प्रतिनिधित्व केले आणि संघाचे नेतृत्व देखील केले. 

) नासीर हुसेन(Nasser Hussain):

चेन्नईत जन्मलेल्या या क्रिकेटपटूने इंग्लंड क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले. इंग्लंड संघात स्थान मिळवण्यासाठी नासीर हुसेनला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. मात्र संघात स्थान मिळवल्यानंतर त्याने या संघाचे नेतृत्व देखील केले. नासीर हुसेनने ४५ कसोटी आणि ५६ वनडे सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व केले. ज्यात १७ कसोटी आणि २८ वनडे सामन्यात त्याने इंग्लंड संघाला विजय मिळवून दिला. नासीर हुसेन हा इंग्लंडच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.

) आशीष बगाई(Ashish Bagai) :

आशीष बगाईचा जन्म १९८२ मध्ये दिल्ली येथे झाला होता. वयाच्या ११ व्या वर्षी तो आपल्या कुटुंबासह कॅनडा येथे स्थलांतरित झाला होता. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅनडा संघाचे प्रतिनिधित्व केले तसेच या संघाचे नेतृत्व देखील केले. त्याने २७ वनडे आणि ४ टी२० सामन्यांमध्ये कॅनडा संघाचे नेतृत्व केले. ज्यात त्याला ८ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते.

३) शिवनारायण चंद्रपॉल(Shivnarine Chanderpaul):

शिवनारायण चंद्रपॉलला तुम्ही वेस्ट इंडिज संघासाठी खेळताना पाहिलं आहे. परंतु अनेकांना ही बाब माहीत नसेल की, शिवनारायण चंद्रपॉल हा मूळचा भारतीय आहे. त्याचा जन्म वेस्ट इंडिजमधील गयाना येथे झाला असला तरीदेखील त्याचे आई वडील भारतीय आहेत. ते बिहार येथे राहायचे. त्याने वेस्ट इंडिज संघासाठी १०० कसोटी सामने खेळले. तसेच १६ वनडे आणि १४ कसोटी सामन्यात त्याने वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व केले.

४) हाशिम आमला(Hashim Amla) :

दक्षिण आफ्रिकेसाठी अप्रतिम कामगिरी करणारा हाशिम आमला मूळचा भारतीय आहे. त्याचे कुटुंब गुजरातमध्ये राहत होते. त्याने २००४ मध्ये भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच त्याने १४ कसोटी, ९ वनडे आणि २ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व केले आहे.

काय वाटतं मंडळी? या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले असते का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required