कसोटी क्रिकेटमध्ये या मातब्बर फलंदाजांनी झळकावले आहे एकापेक्षा अधिक वेळेस त्रिशतक, पाहा यादी..

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळला गेला होता. हा सामना १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला होता. कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत अनेक मोठ मोठे विक्रम प्रस्थापित केले गेले आहेत. अनेक फलंदाजांनी शतकं आणि द्वीशतकं झळकावण्याचा पराक्रम केला आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, असे देखील काही फलंदाज आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकापेक्षा जास्त वेळेस त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. कोण आहेत ते फलंदाज? चला जाणून घेऊया.

)ब्रायन लारा (Brian Lara) :

वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन चार्ल्स लाराच्या नावे अनेक मोठ मोठे विक्रम आहेत. ब्रायन लाराचा जन्म २ मे १९६९ रोजी वेस्ट इंडिजच्या त्रिनिदादमध्ये झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये वैयक्तिक ४०० धावा करण्याचा विक्रम हा ब्रायन लाराच्या नावे आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ब्रायन लाराने एकूण १३१ कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने ५२.८९ च्या सरासरीने १९९५३ धावा केल्या होत्या. ज्यात त्याने ४८ अर्धशतक आणि ३४ शतक झळकावले होते. तसेच दोन वेळेस त्रिशतक देखील झळकावले आहे.

) डॉन ब्रॅडमन (Don Bradman) :

ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज खेळाडूचं संपूर्ण नाव डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन असे आहे. परंतु क्रिकेट विश्वात त्यांची ओळख सर डॉन ब्रॅडमन अशी आहे. डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण ५२ सामने खेळले ज्यात त्यांनी ९९.९४ च्या सरासरीने ६९९६ धावा केल्या. तसेच त्यांनी आपल्या कारकीर्दीत दोन वेळेस त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.

) वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) :

भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने १५ वर्ष भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघाचे प्रतिनिधित्व करताना अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. मुलतान का सुलतान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत दोन वेळेस त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. तसेच त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १०४ कसोटी सामन्यात ४९. ३४ च्या सरासरीने ८५५६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ३२ अर्धशतक आणि २३ शतक झळकावले आहेत. तसेच ३१९ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required