computer

आयपएलचे टॉप ५ मॅन ऑफ दि मॅच...तुमचा आवडता खेळाडू कोण?

आयपीएल म्हटली म्हणजे जगातील सर्वोत्तम खेळाडूंची जत्रा भरलेली असते. या सर्व खेळाडूंमध्ये पर्पल कॅप, ऑरेंज कॅप किंवा मॅन ऑफ द मॅच होण्यासाठी चढाओढ लागलेली पाहायला मिळत असते. आज आपण अशाच पहिल्या पाच मॅन ऑफ द मॅच विजेत्या खेळाडूंची माहिती घेणार आहोत. 

१. ए बी डिव्हीलीयर्स

दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू सर्व जगात आपल्या भन्नाट फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या विराट कोहलीसोबत त्याची नेहमी तुलना केली जात असते. अतिशय शानदार फटक्यांची आतिषबाजी तो मैदानात आल्यावर पाहायला मिळत असते. रॉयल चॅलेंजर्स कडून खेळताना डिव्हीलीयर्सने सर्वाधिक २३ वेळा मॅन ऑफ द मॅच पटकावला आहे.

२. ख्रिस गेल

क्रिस गेल आपल्या लांब लांब सिक्सर्ससाठी आणि तुफान बॅटिंगसाठी ओळखला जातो. कमीत कमी चेंडूत जास्तीतजास्त धावा असा विक्रम जर काढायचा म्हटला तर तो निश्चितपणे गेलच्या नावावर निघेल, एवढी मुसळधार बॅटिंग तो करतो. म्हणूनच गेलच्या नावावर आजवर २२ वेळा मॅन ऑफ द मॅच नोंदवला गेला आहे.

३. रोहित शर्मा

हिटमॅन रोहित शर्मा गेल्या काही वर्षात झपाट्याने फॉर्ममध्ये आला आहे. कुठल्याही रेकॉर्डसची यादी तयार केली आणि त्यात रोहित शर्मा दिसला नाही असे क्वचितच होते. या यादीत देखील १८ वेळा मॅन ऑफ द मॅच सहित तो तिसऱ्या स्थानी आहे. 

४. महेंद्र सिंग धोनी आणि डेव्हिड वॉर्नर

वॉर्नर सध्या मैदानावर कमी आणि टिकटॉकवर जास्त दिसत असला तरी मैदानावरील त्याची खेळी ही शानदार असते. जगातील सर्वोत्तम मॅच फिनिशर असलेला धोनी मॅच जिंकून देण्यासाठीच प्रसिद्ध असल्याने तो यादीत असणे काही धक्कादायक नाही. डेव्हिड वार्नर आणि धोनी हे दोन्ही १७ वेळा मॅन ऑफ द मॅचचे विजेते ठरले आहेत. 

५. युसूफ पठाण

युसूफ पठाण हा अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही प्रकारात चांगली कामगिरी करत असल्याने त्याच्या वाट्याला देखील १६ वेळा मॅन ऑफ द मॅच आला आहे. 

 

तर, हे आहेत पहिले 5 खेळाडू, या 5 नंतर सुरेश रैना हा 14 वेळा तर विराट कोहली याने 13 वेळा मॅन ऑफ द मॅच पटकावला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required