ICC T20 रँकिंग: रोहित,कोहली नव्हे तर एकट्या ईशानने केलाय टॉप -१० मध्ये प्रवेश...

काही दिवसांपूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. सुरुवातीचे दोन सामने दक्षिण आफ्रिका संघाने तर पुढील दोन सामने भारतीय संघाने जिंकले होते. अंतिम टी -२० सामना पावसामुळे धुळीस मिळाला आणि ही मालिका बरोबरीत समाप्त झाली. या मालिकेत भारतीय संघाकडून एक फलंदाज चांगलाच चमकला तो म्हणजे ईशान किशन (Ishan kishan). ही मालिका झाल्यानंतर आता आयसीसीने टी -२० फलंदाजांची रँकिंग जाहीर केली आहे. ज्यात भारतीय संघासाठी यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या ईशान किशनने टॉप -१० मध्ये स्थान मिळवले आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या टी -२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये ईशान किशन का एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्याने टॉप -१० मध्ये स्थान मिळवलं आहे. तर टॉप -५ फलंदाजांमध्ये कुठलाही बदल झाला नाहीये. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) ८१८ पॉईंट्ससह पहिल्या स्थानी कायम आहे. तर त्याचा सह खेळाडू मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) ७९४ पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज मार्करम ७५७ पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे.

तसेच इंग्लंडचा डेविड मलान ७२८ पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच ७१६ पॉइंट्ससह पाचव्या स्थानी आहे. तर विस्फोटक भारतीय फलंदाज ७०३ पॉइंट्ससह सहाव्या स्थानी पोहोचला आहे. जर आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली तर तो टॉप -५ मध्ये देखील प्रवेश करू शकतो.

भारतीय संघासाठी केल्या आहेत सर्वाधिक धावा..

ईशान किशन यावर्षी भारतीय संघासाठी टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने यावर्षी भारतीय संघासाठी टी -२० क्रिकेट खेळताना ४०३ धावा केल्या आहेत. इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला ४०० धावांचा आकडा देखील पार करता आला नाहीये. त्याची ही कामगिरी पाहता त्याला आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते. तो कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. यासह यष्टिरक्षकाची भूमिका देखील पार पाडू शकतो. 

काय वाटतं? आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत ईशान किशनला भारतीय संघात स्थान मिळेल का? कमेंट करून नक्की कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required