computer

जार्वोच्या आचरट वागण्याला आता सगळेच कंटाळले - जार्वो पोलीसांच्या ताब्यात

इंग्लंडमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरू आहे.या मालिकेत सर्वात चर्चित चेहरा हा दोन्ही देशांचा कोणी खेळाडू नसून जार्वो नावाचा एक वेगळाच गडी आहे.गेली दोन सामने ऐनवेळी मैदानात घुसून खेळात व्यत्यय आणणाऱ्या या भावाने या सामन्यात पून्हा एकदा तेच केले आहे.सुरुवातीला त्याच्या या उद्योगाचे सर्वांनाच कौतुक होते पण काल बहुतेक सगळेच कंटाळले आणि आता जार्वोला पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे.

सध्या ओव्हल येथे चौथा कसोटी सामना सुरू आहे.या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ३४ व्या ओव्हर दरम्यान जार्वो मैदानावर शिरला. मागच्यावेळी तो हेल्मेट घालून मैदानात उतरला तर यावेळी तो बॉल घेऊन आला होता.या सामन्यात ही त्याला सिक्युरिटीने पकडून नेले.

 

 जार्वो एक यु ट्यूबर असल्याची चर्चा आहे.साहजिक हा त्याचा पब्लिसिटी स्टंट असण्याची शक्यता आहे. पण त्याच्या या आगाऊपणामूळे अनेक धोके संभवतात. कोरोनाचा धोका असल्याने कोरोना संक्रमणाची भीती तसेच मैदानावरील सुरक्षा हा पण महत्वाचा मुद्दा यातून पुढे येतो.

प्रँक व्हिडीओ बनविणाऱ्या या जार्वोचे पूर्ण नाव डॅनियल जार्वीस आहे.या सामन्यात देखील तो पळत आला , इंग्लिश खेळाडू जॉनी बेयरस्टो आणि त्याची टक्कर झाली. बेयरस्टो यामुळे चांगलाच भडकलेला दिसला होता. 

पण आता या जार्वोचा आगाऊपणा त्याच्या अंगलट आला आहे. स्वतःचा मोफत प्रचार करून पब्लिसिटी करण्यासाठी त्याने ही आयडिया शोधली असली तरी त्याला आता अटक करण्यात आली आहे. तो सध्या दक्षिण लंडनच्या पोलीस स्टेशनमध्ये बंद आहे. त्याची पब्लिसिटी त्याला अशाप्रकारे महागात पडली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required