पुजारासोबत खेळण्याच्या अनुभवाबद्दल बोलतोय पाक-खेळाडू रिझवान..वाचा काय आहे त्याच म्हणणं

भारतीय संघाचा कसोटीवर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) आणि पाकिस्तान संघाचा विस्फोटक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) सध्या काउंटी चॅम्पियनशिप (County championship) खेळण्यात व्यस्त आहेत. हे दोन्ही फलंदाज एकाच संघातून खेळत आहेत. दरम्यान मोहम्मद रिजवानने चेतेश्वर पुजारासोबत फलंदाजी करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय कसोटी संचाचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. तो या स्पर्धेत ससेक्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. याच संघात पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान देखील आहे. दोन्ही फलंदाजांचे एकत्र फलंदाजी करत असल्याचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. तसेच डरहम संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद रिजवान यांनी मिळून १५४ धावांची भागीदारी केली होती. 

दरम्यान क्रिकविक सोबत चर्चा करताना मोहम्मद रिझवानने चेतेश्वर पुजारा सोबत फलंदाजी करत असतानाचा अनुभव सांगितला आहे. त्याने म्हटले की, "मला पुजारा सोबत खेळताना काहीच वेगळं जाणवलं नाही. तुम्ही पुजाराला हाच प्रश्न विचाराल तर त्याचं उत्तर देखील हेच असेल. मी त्याच्यासोबत मस्ती करत असतो. तो एक चांगला व्यक्ती आहे. तसेच फलंदाजी करताना एकाग्र होऊन फलंदाजी करत असतो. युनूस खान, फावद आलम आणि चेतेश्वर पुजारा हे असे तीन फलंदाज आहेत ज्यांना मी माझ्या कारकिर्दीत एकाग्र होऊन फलंदाजी करताना पाहिलं आहे."

तसेच भारत पाकिस्तान या दोन्ही देशातील सामन्यांबाबत बोलताना मोहम्मद रिझवान म्हणाला की, "जेव्हा मैदानावर असतो तेव्हा ते युद्धाप्रमाणेच असते. परंतु जेव्हा सर्व खेळाडू मैदानाबाहेर असतात तेव्हा ते एका कुटुंबाप्रमाणे राहत असतात."

सबस्क्राईब करा

* indicates required