विश्वनाथन आनंद नंतर कोण ? अहो, आर. प्रज्ञानंद !! हा आहे जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण 'ग्रॅण्डमास्टर' !!

मंडळी, बुद्धिबळ खेळात कालच भारताने नवा इतिहास रचला आहे. कालच भारतातील मुळचा केरळचा असलेला बुद्धिबळपटू ‘आर. प्रज्ञानंद’ हा जगातील सर्वात तरुण ग्रॅण्डमास्टर बनला. त्याचं वय अवघं १२ वर्ष,  १० महिने, १३ दिवस आहे. इतक्या लहान वयात त्याने इटलीतील ग्रेडाइन ओपन मध्ये दमदार कामगिरी करून दाखवली आहे. त्याने ग्रॅण्डमास्टरच्या तिसऱ्या आणि अंतिम लढतीत नेदरलंडच्या ‘रोलंड प्रूजिस्र्स’ वर मत करत दुसरं स्थान पटकावलं.

स्रोत

सर्वात तरुण ग्रॅण्डमास्टर बनण्याआधी त्याने वयाच्या १० व्या वर्षी जगातील सर्वात तरुण ‘मास्टर’ होण्याचा बहुमान पटकावला होता. एवढ्या कमी वयात त्याने करून दाखवलेल्या कामगिरीने संपूर्ण जगाचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं होतं. या लहानग्यामध्ये भविष्यातील जगज्जेत्याचे गुण आहेत असंही म्हटलं जात होतं.

मंडळी, प्रज्ञानंदचा सर्वात तरुण ग्रॅण्डमास्टर  होण्याचा मान गेल्यावर्षी फक्त अर्ध्या गुणांनी हुकला होता. ते अर्धे गुण जर मिळाले असते तर त्याने युक्रेनच्या सर्गेई कार्याकिनचा रेकॉर्ड तोडून सर्वात तरुण ग्रॅण्डमास्टर होण्याचा खिताब मिळवला असता. सर्गेई कार्याकिनने हा खिताब १२ वर्ष आणि ७ महिने वय असताना मिळवला होता.

स्रोत

प्रज्ञानंद मध्ये चेसची आवड त्याच्या बहिणीमुळे निर्माण झाली. त्याच्या बहिणीला टीव्ही बघण्याची सवय होती. ती सवय मोडण्यासाठी घरच्यांनी तिला चेसकडे वळवलं. बहिण खेळत असलेला हा नवा खेळ बघून प्रज्ञानंद देखील त्यात भाग घेऊ लागला. बुद्धिबळातील त्याचे उपजत गुण बघून त्याच्या कुटुंबाने त्याला चेन्नैच्या ‘चेस गुरुकुल’ मध्ये प्रवेश मिळवून दिला. त्याचा आजवरचा प्रवास याच गुरुकुलातून झालेला आहे.

राव, अवघ्या १२ वर्ष वयात आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर ग्रॅण्डमास्टर पदवी मिळवणाऱ्या आपल्या ‘आर. प्रज्ञानंद’ला बोभाटाचा सलाम.

मंडळी, थांबा थांबा...प्रज्ञानंदने ग्रॅण्डमास्टर  पद जिंकलं पण तुम्हाला माहित आहे का ग्रॅण्डमास्टर  म्हणजे नेमकं काय आणि ही पदवी कोण देतं ? माहित करून घेण्यासाठी खालील व्हिडीओ बघा राव !!

 

 

आणखी वाचा :

बुद्धिबळात जिंकायचंय ? या पाच टीप्स नक्कीच उपयुक्त ठरतील

आजचं चॅलेंज : दोन चालीत मात करून दाखवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required