रिकी पाँटिंगने T20I क्रिकेटमधील टॉप -5 खेळाडूंची केली निवड; यादीत २ भारतीयांचा समावेश...

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी -२० क्रिकेटचा क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे जगभरात अनेक टी -२० लीग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धांमध्ये अनेक असे खेळाडू आहेत जे चांगली कामगिरी करताना दिसून येत आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम ५ खेळाडूंची निवड केली आहे. त्याने या खेळाडूंमध्ये २ भारतीय खेळाडूंची निवड केली आहे. तर पाकिस्तान, इंग्लंड आणि अफगानिस्तान संघातील प्रत्येकी १-१ खेळाडूची निवड केली आहे. चला तर पाहूया कोण आहेत ते ५ खेळाडू.

) राशिद खान (Rashid Khan) :

अफगाणिस्तान संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खानला त्याने या यादीत पहिले स्थान दिले आहे. राशिद खान सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ६९ सामन्यांमध्ये एकूण ११६ गडी बाद केले आहेत. रिकी पाँटिंगने राशिद खान बद्दल बोलताना म्हटले की, "राशिद खानला मला पहिल्या स्थानी ठेवायला आवडेल. खरं सांगायचं झालं तर, आमच्याकडे आयपीएल स्पर्धेच्या लिलावात आणखी एका खेळाडूची जागा आणि विकत घेण्यासाठी कुठल्याही पर्सची मर्यादा नसती तर राशिद खान असता ज्याला आम्ही आमच्या संघात स्थान दिले असते.

) बाबर आझम (Babar Azam) :

त्याने या यादीत पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमला दुसरे स्थान दिले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बाबर आझम सध्या जोरदार कामगिरी करतोय. मात्र त्याला आशिया चषक स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. याबाबत बोलताना रिकी पाँटिंगने म्हटले की, "मी बाबर आझमला या यादीत दुसऱ्या स्थानी ठेवू इच्छितो. कारण तो टी -२० क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. त्याने गेल्या काही वर्षांत पाकिस्तान संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे."

) हार्दिक पंड्या (Hardik pandya) : 

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला त्याने या यादीत तिसरे स्थान दिले आहे. पाँटिंगने हार्दिक पंड्या बाबत बोलताना म्हटले की, "सध्या जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पंड्याला दुर्लक्ष करणं खूप कठीण आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी केली होती. त्याला गोलंदाजी करताना पाहून आनंद झाला."

) जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah):

रिकी पाँटिंगने भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या यादीत चौथे स्थान दिले आहे. जसप्रीत बुमराह आशिया चषक २०२२ स्पर्धेत खेळताना दिसून येत नाहीये. मात्र जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज आहे. तो कुठल्याही क्षणी गोलंदाजीला येऊन सामना जिंकून देऊ शकतो. याबाबत बोलताना रिकी पाँटिंगने म्हटले की, "जसप्रीत बुमराह या यादीत चौथ्या स्थानी आहे. तो सध्या टी -२०, वनडे आणि कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे. नवीन चेंडूने गोलंदाजी करताना तो खूप घातक ठरू शकतो."

) जोस बटलर (Jos Buttler) :

रिकी पाँटिंगने या यादीत पाचव्या स्थानी इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जोस बटलरला संधी दिली आहे. याबाबत बोलताना रिकी पाँटिंगने म्हटले की,"जेव्हा तुम्ही त्याच्याविरुद्ध प्रशिक्षण देत असाल, तेव्हा तुम्हाला माहीत आहे की त्याच्याकडे असे काही आहे जे इतर अनेक खेळाडूंकडे नसते, त्याच्याकडे सामना फिरवण्याची क्षमता आहे."

या ५ खेळाडूंची निवड त्याने या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी पाहून केली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required